शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

चेन्ना प्रकल्पासाठी आंदोलन करणार

By admin | Updated: July 23, 2015 01:19 IST

तालुक्यातील चेन्ना सिंचन प्रकल्प अद्यापही रखडला असल्याने शेतकऱ्यांना सिंचन सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.

मुलचेरात शेतकऱ्यांची बैठक : प्रकल्प रखडल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित
मुलचेरा : तालुक्यातील चेन्ना सिंचन प्रकल्प अद्यापही रखडला असल्याने शेतकऱ्यांना सिंचन सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने सदर प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, प्रसंगी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी मुलचेरा येथे आयोजित बैठकीमध्ये केला.
वीर बाबुराव शेडमाके सभागृहात घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी दादाजी सिडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून मधुसुदन गाईन, शैंलेंद्र खराती, विठ्ठल निखुले, हलदार, प्रकाश दत्ता, बादलशहा, सुभाष आत्राम, गणेश बंकावार, सरपंच हरिपद पांडे, सरपंच मारोती पल्लो उपस्थित होते.
मुलचेरा तालुक्यातील चिन्ना सिंचन प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागातर्फे १३ मे १९७७ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. १९७८ पासून प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. १९८० पर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले होते. यामुळे सदर प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळेल, अशी आशा बळावली होती. मात्र १९८० मध्ये वन संवर्धन कायदा लागू झाल्याने चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले. तेव्हापासून सिंचन प्रकल्पाचे काम बंदच आहे. चेन्ना सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी ३७७ हेक्टर जमीन आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या कामाचे सुरूवातीचे अंदाजपत्रक १ कोटी ८० लाख रूपयांचे होते. २०१४ पर्यंत प्रकल्पाची किंमत ८० कोटी रूपयांवर पोहोचली. या सिंचन प्रकल्पाचा फायदा तालुक्यातील १० ग्राम पंचायतींना होणार आहे. यामध्ये आठ ग्राम पंचायती आदिवासी व दोन ग्राम पंचायती बंगाली, अल्पसंख्यांक पुनर्वसित आहेत. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ वनहक्क कायदा २००८ अंतर्गत या प्रकल्पात ८० टक्के ओलीताखालील शेतीला फायदा होणार आहे. २०१४ मध्ये केंद्र सरकारकडून ८ हजार ६४० हेक्टर वनजमीन वनकायद्याच्या कचाट्यातून मुक्त करण्यात आली आहे. परंतु काम मार्गी लागले नाही.
सभेला मुलचेरा तालुक्यातील गोमणी, गोविंदपूर, सुंदरनगर, मुलचेरा, बोलेपल्ली व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)