शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पैशाअभावी एटीएम ‘शटर डाऊन’

By admin | Updated: March 28, 2016 01:34 IST

सलग चार दिवसांच्या सुट्यांमुळे एसबीआय बँकेचे एटीएम वगळता इतर सर्वच बँकांचे एटीएम शुक्रवारपासूनच

गडचिरोली : सलग चार दिवसांच्या सुट्यांमुळे एसबीआय बँकेचे एटीएम वगळता इतर सर्वच बँकांचे एटीएम शुक्रवारपासूनच खळखळाट झाले. त्यामुळे बहुतांश बँकांनी एटीएम शनिवारपासून शटर डाऊन करून ठेवले. रंगपंचमी, गुडफ्रायडे, चौथा शनिवार व रविवार अशा लागोपाठ चार दिवसांच्या सुट्या आल्या. रंगपंचमीचा सण असल्याने बहुतांश नागरिकांनी गुरूवारीच एटीएममधून पैसे काढले. त्यामुळे गुरूवारीच बहुतांश एटीएम रिकामे झाले होते. त्यानंतर सोमवारशिवाय पैसे टाकणे शक्य नाही. ही बाब बँक प्रशासनाच्या लक्षात आल्याने बँकांचे एटीएम शटर डाऊन करून ठेवले. काही बँकांच्या एटीएमचे दार सुरू असले तरी त्यामध्ये पैसे नसल्याने एटीएमपर्यंत गेलेले नागरिक तपासणी करून परत येत होते. बँकांना दुसऱ्या व चवथ्या शनिवारी सुटी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच चार दिवसांच्या सुट्या मिळाल्या आहेत. पुढील आठवड्यात मार्च एन्डींग सुरू होणार आहे. त्यामुळे याही आठवड्यात जवळपास दोन दिवस बँका बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बँकांना लागोपाठ सुट्या आल्यानंतर पुरेशी रक्कम एटीएममध्ये जमा करून ठेवल्यास नागरिकांना सोयीचे होईल. सतत चार दिवस जिल्हाभरातील बँका बंद असल्याने व्यापारी व सामान्य नागरिकांचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. रविवारी बाजार असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचीही पंचाईत झाली. (नगर प्रतिनिधी)एसबीआयच्या एटीएमवर भिस्त४एसबीआय बँकेचे एटीएम शनिवारी शटर डाऊनच होते. मात्र रविवारी एटीएम सुरू करण्यात आले. शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याने ग्राहकांचा ओढा एसबीआय बँकेच्या एटीएमकडे वाढला होता. सकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची रांग लागली होती. मात्र या एटीएममधीलही १०० च्या नोटा सायंकाळपर्यंत संपल्या होत्या. त्यामुळे किमान ५०० रूपये काढल्याशिवाय नागरिकांकडे पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता. सुट्यांच्या कालावधीत पुरेशी रक्कम टाकून ठेवण्याची मागणी आहे.