शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, खासदारांच्या कार्यालयासमोर घंटानाद

By admin | Updated: July 13, 2015 01:44 IST

जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी रविवारी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार...

गडचिरोली : जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी रविवारी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्त्व युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, जिल्हा काँग्रेसचे महासचिव सतीश विधाते, युवक काँग्रेसचे महासचिव महेंद्र ब्राह्मणवाडे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड यांनी केले. रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातील व परिसरातील युवक काँग्रेस व एनएसयूआयचे कार्यकर्ते येथील विधाता मेडिकलसमोर गोळा झाले. त्यानंतर येथून दुपारी १ वाजता शेकडो कार्यकर्ते खा. अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर घंटानाद करीत पोहोचले. दरम्यान खा. अशोक नेते यांनी प्रवेशद्वारावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
त्यानंतर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास खा. अशोक नेते यांच्या कार्यालयातून चामोर्शी मार्गे इंदिरा गांधी चौकातून धानोरा मार्गावरील आ. डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकत्यांनी घंटानाद आंदोलन सुरू केले. दरम्यान युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात घोषणा दिल्या. मात्र यावेळी आ. डॉ. देवराव ेहोळी कार्यालयात उपस्थित नव्हते. कार्यक्रमानिमित्त ते बाहेरगावी असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकाकडून पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांचे स्वीय सहायक दिलीप म्हस्के यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी भाजप पदाधिकारी अविनाश महाजन उपस्थित होते. या घंटानाद आंदोलनात अमिता मडावी, लता पेदापल्ली, दीपक ठाकरे, अमोल भडांगे, भाष्कर बुरे, गौरव अलाम, आकाश सादुलवार, नितेश बाळेकरमकर, दर्शन वालदे, आकाश बगेल, राहूल मुनघाटे, संतोष फरकाळे, राहूल म्हस्के, दिलीप चौधरी, रिना टेकाम, वैशाली कुमरे, बाळू मडावी, प्रशांत शेंडे, प्रफुल आचले, वृषभ धुर्वे, सौरभ म्हशाखेत्री आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
महत्त्वाच्या प्रश्नांवर पाठपुरावा करणार- अशोक नेते
घंटानाद आंदोलनप्रसंगी खा. अशोक नेते यांच्या कक्षात युवक काँग्रेस व एनएसयूआयचे प्रमुख पदाधिकारी व खासदारांमध्ये विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. धानोरा तालुक्यातील जवळपास २० गावांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी व मोबाईल क व्हरेज नाही. मात्र या गावातील विकास कामांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ई- निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे काम घेणाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. इंटरनेटचा अभाव असलेल्या क्षेत्रातील कामांना ई-निविदा प्रक्रियेतून वगळण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे महासचिव पंकज गुड्डेवार यांनी केली. तसेच यावेळी ओबीसी आरक्षण, पेसा कायद्याबाबत राज्यपालांच्या अधिसूचनेच्या सुधारणेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान खा. अशोक नेते यांनी जिल्ह्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असून सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा कायम राहिल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले. चर्चेप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश भुरसे उपस्थित होते.