शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार गजबे यांचे दारूबंदीला समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST

गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी कायम राहणे व २०२१ मधील नगरपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे. असे मत आ. ...

गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी कायम राहणे व २०२१ मधील नगरपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे. असे मत आ. कृष्णा गजबे यांनी व्यक्त करीत जिल्हा दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. दारूबंदीमुळे जिल्ह्यातील दारू कमी झाली आहे. दारूबंदीमुळे स्त्रियांचा व जनतेचा फायदा झालेला आहे. दारूबंदी टिकून राहावी यासाठी राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. सोबतच जिल्ह्यातील हजाराहून अधिक गावांनी ठराव घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दारूबंदी कायम ठेवण्याची विनंती केली आहे.

लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान विविध गावांनी ठराव घेत दारूमुक्त निवडणुकीचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यानसुद्धा आ. कृष्णा गजबे यांनी दारूमुक्त निवडणूक व दारूबंदी मजबूत करण्याचा संकल्प केला होता. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा ८९, देसाईगंज २८, आरमोरी ४९, कोरची ९२ अशा एकूण २५८ गावांनी दारूबंदी टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्याच्या दारूबंदीला व येणारी निवडणूक दारूमुक्त व्हावी यासाठी आ. कृष्णा गजबे यांनी समर्थन दर्शविले आहे. सोबतच महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करावी, अशीदेखील मागणी केली आहे.