शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचे गाळे धूळखात पडून

By admin | Updated: November 2, 2016 01:18 IST

मानव विकास मिशनच्या निधीतून गडचिरोली शहरातील पोटेगाव मार्गावर गोंडवाना कला दालनाची इमारत बांधण्यात आली.

दिवसभर चालतो डुकरांचा हैदोस : चुकीच्या पद्धतीने बांधकामाचा परिणामगडचिरोली : मानव विकास मिशनच्या निधीतून गडचिरोली शहरातील पोटेगाव मार्गावर गोंडवाना कला दालनाची इमारत बांधण्यात आली. त्याचबरोबर या इमारतीच्या बाजुला १५ ते १६ दुकानगाळे बांधण्यात आले. मात्र चुकीच्या पद्धतीने दुकानगाळे बांधण्यात आल्याने मागील सहा वर्षांपासून हे सर्वच दुकानगाळे रिकामे आहेत. यावर झालेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असल्याने गडचिरोली जिल्ह्याला मानव विकास निधी अंतर्गत पैसा प्राप्त होतो. याच पैशातून तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांच्या कार्यकाळात गोंडवाना कलादालनाची इमारत बांधण्यात आली. याच इमारतीच्या बाजुला दुकानगाळेही काढण्यात आले. बेरोजगार युवक, बचत गटाच्या सदस्या यांना दुकानगाळे अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश यामागे होता. मात्र गाळ्यांचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. गाळ्यांच्या समोरच संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षक भिंत ओलांडून मुख्य दरवाजातून दुकानगाळ्यांमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी येणे अशक्यच आहे. याचा अंदाज दुकानदारांना आल्याने दुकानदारांनी एकही गाळा खरेदी केला नाही. याच गाळ्यांच्या समोर रस्त्याच्या बाजुला अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. या दुकानांना ग्राहकसुद्धा मिळत आहेत. या परिसरात मुख्य मार्केट नसल्याने ग्राहकांची संख्याही कमी आहे. परिणामी पाहिजे त्याप्रमाणात ग्राहक येत नसल्याचा अनुभव असल्याने दुकानगाळे खरेदी करण्यास तयार होत नाही. या परिसरात दिवसभर डुकरांचाच हैदोस असल्याचे दिसून येते. कलादालनाची दूरवस्थादुकानगाळ्यांच्या बाजूला गोंडवन कलादालनाची इमारत आहे. या इमारतीमध्ये आदिवासींच्या संस्कृतीशी संबंधित अनेक साहित्य ठेवण्यात आले आहेत. मात्र या इमारतीच्या व साहित्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटूनही अजुनपर्यंत या इमारतीला रंगरंगोटीसुद्धा करण्यात आली नाही.