शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथदिंडीतून दिला वाचन संस्कृतीचा संदेश

By admin | Updated: January 21, 2016 00:22 IST

शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने बुधवारी ..

शहर दुमदुमले : खासदारांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ; २५ शाळांचा सहभागगडचिरोली : शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने बुधवारी सकाळी ९ वाजता ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी येथील इंदिरा गांधी चौकातून सर्वोदय वॉर्ड मार्गाने गुजरी परिसरातून मुख्य मार्गाने ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत गडचिरोली शहर व परिसरातील जवळपास २५ शाळांचा सहभाग होता. या ग्रंथदिंडीचा शुभारंभ इंदिरा गांधी चौकात खा. अशोक नेते व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या हस्ते ग्रंथपूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी विभा डांगे, उपशिक्षणाधिकारी निकम, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, प्राचार्य कविता पोरेड्डीवार, प्राचार्य लीना हकीम, माध्यमिक शिक्षण विभागाचे साई कोंडावार आदींसह कनिष्ठ प्राध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ग्रंथदिंडीत शहरातील शाळांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध प्रकारची वेशभूषा धारण करून समाजजीवनाचे दर्शन घडविले. अनेक विद्यार्थ्यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, झांशीची राणी, संत व महापुरूषांची वेशभूषा साकारली. या ग्रंथदिंडीत शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, वसंत विद्यालय, संत गाडगे महाराज विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल सोनापूर, गोंडवाना सैनिकी विद्यालय, विद्याभारती कन्या हायस्कूल, राणी दुर्गावती कन्या विद्यालय गडचिरोली, आदीसह २५ शाळांतील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या ग्रंथदिंडीचा समारोेप सकाळी ११ वाजता धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या कविवर्य मंगेश पाडगावकर नगरीत करण्यात आला. या दिंडीदरम्यान वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरक्षित केली.