मेडिगड्डा बॅरेज ठरतेय कोरोनाचे प्रवेशद्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:52+5:30

अंकिसाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा राज्याने मेडिगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजवर इकडून तिकडे जाण्यासाठी पूल बांधले आहे. या पुलावरून दुचाकी वाहने व पायदळ व्यक्ती ये-जा करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिगड्डा बॅरेज, कालेश्वरम व धर्मपुरी पुलावर पोलीस चौक्या लावण्यात आल्या असल्या तरी नागरिक विविध कारणे सांगून पोलिसांना विनंती करून तेलंगणा राज्यात ये-जा करतात. तेलंगणातीलही नागरिक सिरोंचा तालुक्यात येऊन परत जातात.

Medigadda Barrage is the entrance to Corona | मेडिगड्डा बॅरेज ठरतेय कोरोनाचे प्रवेशद्वार

मेडिगड्डा बॅरेज ठरतेय कोरोनाचे प्रवेशद्वार

Next
ठळक मुद्देविनापरवानगीने ये-जा सुरू : नाक्यावरील नियम कडक करण्याची मागणी; कोरोनाच्या संसर्गाचा धोका

महेश आगुला ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : मेडिगड्डा बॅरेजच्या पुलावरून सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक विनापरवानगीने तेलंगणात जाऊन परत येतात. तर तेलंगणातीलही नागरिक खुलेआम सिरोंचा तालुक्यात प्रवेश करतात. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. आरोग्य विभागाने गुरूवारी अंकिसा येथील नागरिकांची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट केली असता, पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
प्राणहिता व गोदावरी या दोन नद्या महाराष्टÑ व तेलंगणा राज्याच्या दुभाजक आहेत. सिरोंचा तालुका व तेलंगणा राज्यातील नागरिकांची संस्कृती सारखी आहे. तसेच या दोन भागांमध्ये रोटीबेटी व्यवहार होतात. त्यामुळे वर्षभर ये-जा सुरू राहते. पाच वर्षांपूर्वी प्राणहिता व गोदावरी नदीवर एकही पूल नसल्याने पावसाळ्यात ये-जा मर्यादित राहत होती. मात्र सिरोंचा तालुक्यात धर्मपुरी व कालेश्वरमरजवळ पूल झाला आहे. तसेच अंकिसाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा राज्याने मेडिगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजवर इकडून तिकडे जाण्यासाठी पूल बांधले आहे. या पुलावरून दुचाकी वाहने व पायदळ व्यक्ती ये-जा करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिगड्डा बॅरेज, कालेश्वरम व धर्मपुरी पुलावर पोलीस चौक्या लावण्यात आल्या असल्या तरी नागरिक विविध कारणे सांगून पोलिसांना विनंती करून तेलंगणा राज्यात ये-जा करतात. तेलंगणातीलही नागरिक सिरोंचा तालुक्यात येऊन परत जातात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, विनापरवानगीने ये-जा करीत असल्याने आरोग्य विभागाच्याही सदर नागरिक लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांच्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. ई-पास काढून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाणे शासनाने सक्तीचे केले असले तरी हे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. आरोग्य व पोलीस विभागाने दक्षता घेण्याची गरज आहे.

अंकिसात आढळले पाच कोरोनाबाधित?
अंकिसा येथे गुरूवारी कोरोना तपासणी शिबिर आयोजित केले होते. यादरम्यान घेतलेल्या रॅपिड एन्टीजन टेस्टमध्ये सिरोंचातील चार व रंगधामपेठा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बाधितांमधील एक व्यक्ती ग्रा.पं.चा लिपीक आहे. हा मेडिगड्डा मार्गे तेलंगणात गेला होता. त्यांच्या कुटुंबातील इतर तीन व्यक्ती व रंगधामपेठा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला. बाधितांची संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे सुरू आहे, अशी माहिती सिरोंचाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोहर कन्नाके यांनी दिली आहे.

२ कोरोनामुक्त, ४ बाधित
गडचिरोली व देसाईगंज येथील प्रत्येकी एक रूग्ण कोरोनामुक्त झाला. तर चार रूग्ण बाधित आढळून आले आहेत. बाधितांमध्ये गडचिरोली पोलीस कॉलनीतील एक पोलीस, मुलचेरातील आरोग्य सेविका, धानोरा पोलीस स्टेशनमधील एक कर्मचारी व याच तालुक्यात नागपूरवरून आलेला एकाचा समावेश आहे.

Web Title: Medigadda Barrage is the entrance to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.