शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

लग्नसोहळा स्थगित करून दिला कोरोनापासून बचावाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 6:00 AM

सामाजिक दायित्वातून कोरोनाबद्दलची जनजागृती करणारे संदेश पाठवून वर-वधू पक्षाच्या मंडळींनी संवेदनशिलतेचा परिचय दिला. ‘गरीबाच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न’ अशी एक म्हण प्रचलित आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या विघ्नाने गरिब किंवा श्रीमंत असा भेद न करताच सर्वांनाच लपेटले आहे. त्यामुळे अनेकांचे मार्च, एप्रिलमध्ये होणारे लग्न पुढे ढकलण्याची पाळी आली.

ठळक मुद्देकोरोना रोखण्यासाठी पुढाकार : राऊत आणि मिसार परिवाराचा निर्णय

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : विवाह म्हणजे जीवनातील अतीव प्रतीक्षेचा आणि आनंदादायी असा कौटुंबिक, सामाजिक उत्सव. प्रत्येक जण विवाहसंस्कार आपापल्या पध्दतीने जेवढा अविस्मरणीय करता येईल तेवढा प्रयत्न करीत असतो. यासाठी वर्षभरापासून जय्यत तयारीसुध्दा सुरू झालेली असते. आनंदाला उधान आलेले असते. पण यावर्षी कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सर्वच सोहळ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. मात्र सोहळ्याचा आनंद घेता आला नाही तरी पाहुण्यांना केवळ सोहळा रद्द झाल्याचा निरोप न देता सामाजिक दायित्वातून कोरोनाबद्दलची जनजागृती करणारे संदेश पाठवून वर-वधू पक्षाच्या मंडळींनी संवेदनशिलतेचा परिचय दिला.‘गरीबाच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न’ अशी एक म्हण प्रचलित आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या विघ्नाने गरिब किंवा श्रीमंत असा भेद न करताच सर्वांनाच लपेटले आहे. त्यामुळे अनेकांचे मार्च, एप्रिलमध्ये होणारे लग्न पुढे ढकलण्याची पाळी आली. त्याअनुषंगाने प्रथम देशहिताला सहकार्य करण्याच्या भावनेतून देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील उपवर आकाश मारोती राऊत आणि वधुपक्ष मिसार यांच्याकडील मंडळींनी दि.२७ मार्चला नियोजित असलेले लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निमंत्रित पाहुणेमंडळींना सोशल मिडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून आप-आपल्या घरी राहात सरकार व प्रशासनाला कोरोनाशी लढण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.कुरूड येथील स्व.मारोती राऊत यांचे चिरंजीव आकाश व स्व.हरिश्चंद्र मिसार यांची मुलगी तेजस्वीनी (रा.कन्हाळगाव ता.लाखांदूर, जि. भंडारा) यांचा विवाह सोहळा दि.२७ ला कुरूड येथे संपन्न होणार होता. परंतु संपूर्ण समाजावर आलेली कोरोनाची आपत्ती लक्षात घेऊन लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आला. उपवर आकाश यांनी निमंत्रितांना याची माहिती देताना कोरोना आजाराबाबत कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शनही केले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न