शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या मर्जीवर चालते बाजार समिती

By admin | Updated: July 15, 2015 01:49 IST

गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समिती ही केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. लाखो रूपये खर्च करून बाजार समितीने इमारत व इतर पायाभूत सुविधा निर्माण केल्यात.

घरीच केली जाते शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी : बाजार समितीचे नियंत्रणही नाही
गडचिरोली : गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समिती ही केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. लाखो रूपये खर्च करून बाजार समितीने इमारत व इतर पायाभूत सुविधा निर्माण केल्यात. मात्र सध्या त्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना होत नसून धान खरेदी-विक्रीचे व्यवहार अडते-व्यापाऱ्यांच्या घरातूनच होत आहेत. त्यामुळे सेसपोटी बाजार समितीचे लाखों रूपयाचे उत्पन्न बुडत आहे.
२६ आॅगस्ट १९८२ ला गडचिरोली जिल्हा निर्माण झाला. त्यापूर्वीच गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात होती. अविभक्त चंद्रपूर जिल्ह्यात गडचिरोली हा तालुका होता व गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तीन तालुक्यांची मिळून गडचिरोली बाजार समिती होती. ही जुनी व प्रचंड आर्थिक उलाढालीस वाव असणारी बाजार समिती असतानाही तिचे बाजार समितीच्या संचालक मंडळ, कर्मचारी व सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे शेतकऱ्यांना या बाजार समितीचा आजवर कोणताही लाभ झालेला नाही. कालांतराने १९९० नंतर चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतंत्र झाली व जिल्हा मुख्यालयाच्या गडचिरोली बाजार समितीचा कारभार शेतकऱ्यांच्या हिताऐवजी व्यापाऱ्यांच्या मर्जीवर चालू लागला.
या बाजार समितीचा सहा एकर जागेत गोकुलनगर परिसरात पसारा आहे. तेथे कार्यालय, गोदाम आहेत. मात्र बाजार समितीचा कोणताही धान्य खरेदी-विक्रीचा व्यवहार या परिसरातून चालत नाही. बाजार समितीने आपले गोदाम व्यापाऱ्यांना भाडे तत्वावर दिले आहे. या बाजार समिती अंतर्गत असलेले परवानाधारक व्यापारी ही राईस मिल मालक आहेत. ते आपल्या यंत्रणेमार्फत गावागावात फिरून वा आपल्या राईसमिलमध्ये बसून शेतकऱ्यांचा माल खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. व्यापारी ठरवेल तोच भाव शेतकऱ्यांना मिळतो. काटाही व्यापाऱ्याच्याच राईस मिलमध्ये होत असल्याने पोत्यामागे दोन ते तीन किलोची कट बारदाण्याच्या नावाखाली केली जाते व यात शेतकऱ्यांचे शोषण केले जाते.
२५ लाखांची आर्थिक उलाढाल वर्षाला असलेल्या या बाजार समितीत सारा आलबेल कारभार आहे. या जिल्हा मुख्यालयाच्या बाजार समितीला आदिवासी विकास महामंडळ, मार्केटिंग फेडरेशन व रेशन दुकानासाठी खरेदी होणाऱ्या धान्यावरही सेस मिळतो. जिल्हा मुख्यालयाच्या या बाजार समितीत भाजीपाला मार्केट व धानाच्या खरेदी-विक्री वाढीलाही प्रचंड वाव आहे. परंतु संचालक मंडळ याबाबीकडे कधीही लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापाऱ्याच्या दारात गेलेल्या शेतकऱ्यांना नेहमीच आरमोरी, चामोर्शी, मूल, कुनघाडा येथील बाजारपेठेपेक्षा ५० ते १०० रूपये कमी दर मिळतो. तक्रारीला कुठेही वाव नाही. काही ठराविक दोन-चार व्यापाऱ्यांच्या मर्जीवरच या बाजार समितीचा कारभार चालतो.(प्रतिनिधी)