सभापती पदांसाठी माेर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST2021-01-08T05:59:03+5:302021-01-08T05:59:03+5:30

गडचिराेली नगर परिषदेत निवडनू आलेले एकूण २५ नगरसेवक आहेत. त्यापैकी भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर २१ सदस्य निवडून आले आहेत. ...

March for the post of Speaker | सभापती पदांसाठी माेर्चेबांधणी

सभापती पदांसाठी माेर्चेबांधणी

गडचिराेली नगर परिषदेत निवडनू आलेले एकूण २५ नगरसेवक आहेत. त्यापैकी भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर २१ सदस्य निवडून आले आहेत. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाला सभापती पद देण्याचा निर्णय यापूर्वीच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे. चार वर्षांच्या कालावधीत वर्षा नैताम,पूजा बाेबाटे व मंजुषा आखाडे या नगरसेवकांना सभापतिपद मिळाले नाही. त्यामुळे त्यांना यावर्षी सभापतिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. बांधकाम, आराेग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, पाणी पुरवठा, वित्त व नियाेजन या सहा समित्यांच्या सभापतींची निवड करायची आहे. त्यापैकी उपाध्यक्ष हे एका समितीचे पदसिध्द सभापती राहतात. तर आवश्यकतेनुसार महिला व बाल कल्याण उपसभापतीची सुध्दा निवड केली जाते. त्यामुळे यापूर्वी सभापती बनलेल्यांना आणखी सभापती बनण्याची संधी मिळणार आहे.

त्यासाठी आतापासूनच माेर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

Web Title: March for the post of Speaker