शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निकालाने अनेकांना बसले तडाखे; शिवसेना नामशेष

By admin | Updated: February 24, 2017 00:56 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेत अस्थिर स्थिती या निकालाने निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

आदिवासी विद्यार्थी संघाने मिळविले जोरदार यशगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत अस्थिर स्थिती या निकालाने निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर गेल्या निवडणुकीच्या जागा कायम राखण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने यश मिळविला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना मोठा तडाखा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालाने दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजीमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही अहेरी विधानसभा जनतेने नाकारले असल्याचे निकालावरून दिसून येत आहे. लोकसभा, विधानसभा व नगर पालिका निवडणुकीच्या निकालात भाजपचा असलेला विजयाचा रथ काही अंशी जिल्हा परिषद निवडणुकीने रोखला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी आशा बाळगली जात होती. मात्र भारतीय जनता पक्ष बहुमतापासून काही जागा दूर आहे. भाजपला आरमोरी विधानसभा क्षेत्रात नऊ जागांवर तर काँग्रेसला पाच जागांवर यश मिळाले आहे. या भागातून शिवसेना संपूर्णत: नामशेष झाली आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात धानोराचा गड कायम राखण्यात काँग्रेसने यश मिळविले आहे. तालुक्यातील मुस्का-मुरूमगाव जागा वगळता संपूर्ण तिन्ही जागा काँग्रेसने कायम राखले आहे. गडचिरोली तालुक्यात काँग्रेसने दोन जागा नव्याने पदरात पाडले आहे. गेल्यावेळी या तालुक्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यावेळी अ‍ॅड. राम मेश्राम व वैशाली किरण ताटपल्लीवार निवडून आल्या आहेत. हे दोन्ही विजयी उमेदवार विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत. एटापल्ली, मुलचेरा, कोरची व चामोर्शी तालुक्यातही यावेळी काँग्रेसने नव्याने खाते उघडले आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्यावेळी दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी कॉग्रेस तेथून हद्दपार झाली आहे. मात्र काँग्रेस गेल्यावर्षीच्या जागा कायम राखण्यात यशस्वी झाली. हे काँग्रेसचे मोठे यश आहे. खासदार अशोक नेते यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा पराभव झाल्याने भाजपच्या वर्तुळातही अनेकांना आनंद आहे. डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शीचा गड राखण्यात यश मिळविल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपचे खासदार आमदार व मंत्री सत्ता स्थापन करण्यासाठी कसा प्रयत्न करतात. हे आता लवकरच दिसून येईल.