शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
4
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
5
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
6
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
7
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
8
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
9
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
10
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
12
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
13
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
14
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
15
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
16
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
17
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
18
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
19
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
20
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
Daily Top 2Weekly Top 5

बालगुन्हेगारांसाठी ‘जुवेनाईल’ची निर्मिती

By admin | Updated: February 4, 2016 01:27 IST

आजच्या धकाधकीच्या जगात बालकांचे संरक्षण महत्त्वपूर्ण आहे. पालकवर्ग मुलांच्या भविष्याचा शोध घेत असतो. परंतु अवधानाने त्याच्या हातून गुन्हा घडतो,

कोरडे यांची माहिती : नवीन सुधारित कायद्यावर जनजागृतीगडचिरोली : आजच्या धकाधकीच्या जगात बालकांचे संरक्षण महत्त्वपूर्ण आहे. पालकवर्ग मुलांच्या भविष्याचा शोध घेत असतो. परंतु अवधानाने त्याच्या हातून गुन्हा घडतो, या मागे घर, समाजातील वातावरण व संस्कारही कारणीभूत असतात. अशा १८ वर्षाखालील मुले व मुलींना संरक्षणाच्या हेतूने तो मुलगा खरोखरच गुन्हेगार आहे का, असा विधी संघर्षित बालक म्हणूून त्याच्या विरूद्धच्या कारवाईसाठी नवीन सुधारित संरक्षणात्मक जुवेनाईल कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त सहायक दिवाणी न्यायाधीश एल. डी. कोरडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा महिला, बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना कर्तव्य, भूमिका व जबाबदारी यांची माहिती व्हावी, यासाठी बाल न्याय अधिनियम जनजागृती कार्यक्रम मंगळवारी जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. बी.डी. हुकरे, अतिरिक्त सहायक दिवाणी न्यायाधीश अटकारे, बाल न्याय मंडळाचे सदस्य अ‍ॅड. राहुल नरूले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, शिक्षणाधिकारी माणिक साखरे, पोलीस निरीक्षक नलावडे उपस्थित होते. प्रास्ताविक अविनाश शेटीया यांनी केले. कार्यक्रमाला बाल पोलीस पथक, बाल संरक्षण युनिट, बाल न्याय मंडळ, पोलीस पाटील, शिक्षण, आदिवासी, कामगार विभागाचे प्रतिनिधी हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)कुणीही जन्मापासून गुन्हेगार नसतो- कळसकरअहेरी : मुलं हे जन्मापासून गुन्हेगार नसतात, त्यांना प्रेमरूपी योग्य संस्काराची गरज असते, ते मिळाल्यास कधीही ते गुन्हेगारीकडे वळू शकत नाही, असे प्रतिपादन अहेरीचे न्यायाधीश दि. जे. कळसकर यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली अंतर्गत तालुका विधी सेवा समिती, अहेरीतर्फे दिवाणी व फौजदारी न्यायालय अहेरी येथील सभागृहात बाल न्यायालय विषयी मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अ‍ॅड. पी. एस. डंबोळे, अ‍ॅड. एस. व्ही. जैनवार, अ‍ॅड. व्ही. एस. गलबले उपस्थित होते. याप्रसंगी न्यायाधीश कळसकर म्हणाले की, सर्व न्यायालयीन बाबी गोपनीयतेने करण्याचे कार्य बाल कल्याण समिती , बाल न्याय मंडळतर्फे होत असतात ह्यासाठी सहकार्य करावे व सर्वांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्य करावे. प्रास्ताविक एस.व्ही. जैनवार, संचालन व्ही.एस. गलबले व आभार पी.एस. डंबोळे यांनी केले. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व स्वयंसेविका उपस्थित होत्या.