शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

६५९ गावांमध्ये राबविणार हिवताप सर्वेक्षण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे सक्रिय संक्रमण होत आहे. त्यामुळे हिवतापाचा समूळ नायनाट करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवून समस्याग्रस्त भागाचा शोध घेऊन तेथील सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत २ लाख २० हजार ७९६ लोकांचे रक्तनमुने आणि १४ हजार ४४ लोकांची आरडीकेद्वारा तपासणी होणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगली भूभागामुळे हिवतापाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या जिल्ह्यात हिवताप सर्वेक्षणासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मनोहर पोरेटी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. दि. १७ फेब्रुवारी ते २० मार्च यादरम्यान ही हिवताप शोधमोहीम ६५९ गावांमध्ये राबविली जाणार आहे.विशेष हिवताप सर्वेक्षण मोहीम ही जंतूभार १० व त्यापेक्षा जास्त असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. यासाठी ५ तालुके, १५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १११ उपकेंद्र आणि ६५९ गावांची निवड करण्यात आली आहे. त्या गावांमधील आशा वर्कर आणि ९१ क्षेत्र कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे सक्रिय संक्रमण होत आहे. त्यामुळे हिवतापाचा समूळ नायनाट करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवून समस्याग्रस्त भागाचा शोध घेऊन तेथील सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत २ लाख २० हजार ७९६ लोकांचे रक्तनमुने आणि १४ हजार ४४ लोकांची आरडीकेद्वारा तपासणी होणार आहे. आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य ॲड. राम मेश्राम, रुपाली पंदीलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोषकुमार जठार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बन्सोडे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री आणि जिल्हा हिवताप अधिकारी व डॉ. कुणाल मोडक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आराेग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीतजिल्ह्यातील अनेक गावांची लोकसंख्या फक्त ५० ते ६० असल्यामुळे गावात हिवतापाचा १ किंवा २ रुग्ण आढळला तरी हिवतापाचा इन्डिकेटर २० व त्यापेक्षा जास्त आढळतो. तसेच मान्सून कालावधीत ३० टक्के व त्यापेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्ण हे फक्त गडचिरोली जिल्ह्यातील असतात, त्यामुळे हिवताप निर्मूलन करण्याकरिता विशेष उपाययोजनांची आवश्यकता असते.

 

टॅग्स :Healthआरोग्य