शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

काेरेगाव परिसरात २५ एकरात हाेणार माेहरीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 05:00 IST

रबी तेलबिया पिकांमध्ये मोहरी एक महत्त्वाचे, कमी खर्चाचे व जास्त फायद्याचे पीक आहे. मोहरी पिकाला १० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत या पिकाची लागवड झाल्यास कमीत कमी पाण्यात पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळते. मोहरीमध्ये जवळपास ४० टक्के तेल असल्याने खाद्यतेलाची गरज भागविता येणार आहे. मोहरी बुरशीविरोधक असल्याने लोणची टिकविण्याकरिता व चवीसाठी लोणच्यामध्ये मोहरीची पूड टाकली जाते. या पिकाला ५०५० रु. प्रति क्विंटलप्रमाणे आधारभूत किंमत मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्ककाेरेगाव/चाेप : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने काेरेगाव व चाेप परिसरात सुमारे २५ एकर क्षेत्रावर यावर्षी रब्बी हंगामात माेहरी पिकाची लागवड केली जाणार आहे. अखिल भारतीय समन्वयीत मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूरमार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहरी पीक प्रात्यक्षिकातील लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम कोरेगाव येथे आयोजित केले होते.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप कामडी (मोहरी पैदासकार) कृषी महाविद्यालय नागपूर व डॉ. दीक्षा ताजने (विद्यावेत्ता) कृषी महाविद्यालय नागपूर, भूषण देशमुख, तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम, कृषी पर्यवेक्षक सी. जी. ताडपल्लीवार, काेरेगावचे उपसरपंच अनिल मस्के, पाेलीस पाटील शामराव उईके यांच्यासह कोरेगाव व चाेप येथील शेतकरी बांधव हजर होते.रबी तेलबिया पिकांमध्ये मोहरी एक महत्त्वाचे, कमी खर्चाचे व जास्त फायद्याचे पीक आहे. मोहरी पिकाला १० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत या पिकाची लागवड झाल्यास कमीत कमी पाण्यात पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळते. मोहरीमध्ये जवळपास ४० टक्के तेल असल्याने खाद्यतेलाची गरज भागविता येणार आहे. मोहरी बुरशीविरोधक असल्याने लोणची टिकविण्याकरिता व चवीसाठी लोणच्यामध्ये मोहरीची पूड टाकली जाते. या पिकाला ५०५० रु. प्रति क्विंटलप्रमाणे आधारभूत किंमत मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरणार आहे. शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गेडाम यांनी केले. संचालन कृषी सहायक योगेश बोरकर, आभार कृषी पर्यवेक्षक भूषण देशमुख यांनी मानले. यशस्वीतेसाठी कृषीमित्रांनी सहकार्य केले.

अशी करा पिकाची लागवडडॉ. ताजने यांनी मोहरी पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची निवड, पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. या पिकासाठी निचरा होणारी जमीन आवश्यक असून ३ पाण्याच्या पाळ्या दिल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये मोहरी पैदासकार डॉ. संदीप कामडी यांनी मोहरी पिकाची लागवड पद्धत व एकात्मिक पीक व्यवस्थापनाबद्दल सविस्तरपणे माहिती दिली. योग्यवेळी पेरणी व झाडांची संख्या मर्यादित (६० ते ७० हजार प्रति एकर) ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या पिकास वन्यप्राण्यांचा त्रास कमी प्रमाणात होतो. पेरणी करताना १ किलो बियाणांस १.५ किलो रेती, माती मिसळावे, पिकास एकाच पाण्याची सोय असल्यास फुलोरा अवस्थेत द्यावे. पेरणीपूर्वी बियाणांस प्रति किलो ३ ग्रॅम थायरम लावावे. बियाणांची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणीच्या आधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.