शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

मेडपल्लीचे कामकाज ठप्प

By admin | Updated: July 21, 2014 23:51 IST

भामरागड -आलापल्ली मार्गावरील पेरमिलीजवळ असलेल्या मेडपल्ली येथील ग्रामसेवक हे मागील एक महिन्यापासून सतत गैरहजर असल्याने प्रशासकीय काम पूर्णपणे ठप्प पडले आहे.

कारवाईची मागणी : ग्रामसेवक एक महिन्यापासून गैरहजरआलापल्ली : भामरागड -आलापल्ली मार्गावरील पेरमिलीजवळ असलेल्या मेडपल्ली येथील ग्रामसेवक हे मागील एक महिन्यापासून सतत गैरहजर असल्याने प्रशासकीय काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. सदर ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी मेडपल्लीवासीयांनी केली आहे. मेडपल्ली ही गटग्रामपंचायत असून या ग्रामपंचायती अंतर्गत वेडमपल्ली, कासनपल्ली, गुर्जा, कोरेली (खु.), कोरेली (बु.), तलबाडा व मेडपल्ली ही आठ गावे येतात. ही संपूर्ण गावे अतिशय दुर्गम असून या गावात आदिवासी नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतीसाठी लागणारे कर्ज व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा दाखला असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दहावी, बारावीेचे निकाल लागले आहेत. या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र काढावे लागते. हे सर्व दाखले काढण्यासाठी ग्रामसेवकाकडून मिळणाऱ्या दाखल्यांची गरज भासते. सदर दाखले घेण्यासाठी नागरिक मेडपल्ली येथे जातात. त्यावेळी ग्रामसेवक उपस्थितच राहत नाही. परिणामी नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. ग्रामसेवकाचे या गावांकडे दुर्लक्ष होत असल्याने गावात होणारी विकासकामेही थांबली आहेत. २७ जून २०१४ पासून येथील ग्रामसेवक सतत गैरहजर आहेत. याबाबत नागरिकांनी अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र ग्रामसेवकांवर संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाहीे. नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. संपूर्ण नाल्या गाळाने तुडुंब भरल्या आहेत. मागील अनेक महिन्यापासून गावातील पथदिवे बंद आहेत. सामाजिक कार्यकर्ते कैलास कोरेत व सरपंच सतिश वेलादी यांच्या मार्गदर्शनात ग्रा.पं. सदस्य भगवान मडावी, माजी सरपंच बाबुराव वेलादी, घिसू वेलादी, निलेश वेलादी, सिताराम मेश्राम, नरसिंह कोडापे, विलास तलांडे, लक्ष्मण मडावी, मोतीराम पेंदाम यांनी बीडीओंना निवेदन देऊन ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी केली. अन्यथा सात दिवसानंतर ग्रा.पं.ला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.