शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

लिंगमपल्लीची शाळा उघडते केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:00 AM

अहेरी पंचायत समिती अंतर्गत कमलापूरपासून केवळ चार ते पाच किमी अंतरावर लिंगमपल्ली हे गाव आहे. सदर गाव रेपनपल्ली गटग्रामपंचायत अंतर्गत येते. या गावात आदिवासी समाज व एनटी प्रवर्गाचे लोक वास्तव्य करतात. येथे ४० ते ५० घरे आहेत. सदर गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा व्हावी, या हेतुने सदर गावी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देशिक्षकाचा पत्ता नाही । अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

श्रीधर दुग्गीरालापाटी ।लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातात. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अहेरी उपविभागातील बऱ्याचशा शाळा नेहमी बंदस्थितीत दिसून येतात. कमलापूर नजीकच्या लिंगमपल्ली येथील शाळा केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ध्वजारोहणाच्या निमित्ताने उघडत असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.अहेरी पंचायत समिती अंतर्गत कमलापूरपासून केवळ चार ते पाच किमी अंतरावर लिंगमपल्ली हे गाव आहे. सदर गाव रेपनपल्ली गटग्रामपंचायत अंतर्गत येते. या गावात आदिवासी समाज व एनटी प्रवर्गाचे लोक वास्तव्य करतात. येथे ४० ते ५० घरे आहेत. सदर गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा व्हावी, या हेतुने सदर गावी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. लिंगमपल्ली येथील शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा असून या शाळेत केवळ एक शिक्षक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या शाळेत असलेले एकमेव शिक्षक दररोज शाळेत येत नसल्याने ही शाळा नेहमी कुलूपबंद राहते. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन व २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सदर शाळा उघडल्या जाते. इतर दिवशी शाळा कुलूपबंद असते. यासंदर्भात शिक्षण सभापती अजय कंकडालवार यांना विचारले असता यासंदर्भात अद्याप कोणतीही तक्रार आली नसून असा प्रकार असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.अधिकारी नॉट रिचेबलप्रस्तूत प्रतिनिधींनी लिंगमपल्ली गावात भेट देऊन शाळेची पाहणी केली असता, शाळा कुलूपबंद राहात असल्याचे विदारक वास्तव दिसून आले. या संदर्भात अहेरी पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी प्रफुल महेशकर व गट शिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र त्यांचा मोबाईल सतत नॉट रिचेबल दाखवत होता.

टॅग्स :Schoolशाळा