शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन महामंडळाच्या बसगाडीतून आमदारांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:18 IST

सर्वसामान्य कार्यकर्त्यातून आमदार झालेले आरमोरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार क्रिष्णा गजबे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या ...

आठ वेळा केला प्रवास : सर्वसामान्य प्रवाशांशीही केली हितगूजगडचिरोली : सर्वसामान्य कार्यकर्त्यातून आमदार झालेले आरमोरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार क्रिष्णा गजबे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीतून ब्रह्मपुरी ते नागपूर व नागपूर ते गडचिरोली असा प्रवास केला. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हा त्यांचा महाराष्ट्राच्या लोकवाहिनीतून आठवा प्रवास आहे, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीमध्ये आसन क्रमांक एक व दोन हे खासदार व आमदार यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. परंतु राज्याची लोकवाहिनी समजणाऱ्या या बसगाडीतून अलिकडे तरी कुणी खासदार, आमदार प्रवास करताना सर्वसामान्य प्रवाशांना दिसत नाही. एकदा पदावर निवडून आल्यानंतर विमान किंवा रेल्वे याशिवाय खासदार, आमदारांचा प्रवास होत नाही. परंतु याला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे अपवाद ठरले आहे. आमदार पदावर निवडून आल्यापासून क्रिष्णा गजबे यांनी वडसा ते नागपूर व नागपूर ते गडचिरोली दरम्यान किमान आठवेळा एसटी बसमधून प्रवास केला. २९ फेब्रुवारी रोजी ते ब्रह्मपुरी ते नागपूर या प्रवासाला एसटीनेच निघाले. त्यानंतर नागपूरवरून त्यांनी रेल्वेने मुंबई गाठली. त्यानंतर आपले काम आटोपून गुरूवारी ते नागपूरात परत आले. सकाळी ८ वाजता नागपूर बसस्थानकावर पोहोचून त्यांनी गडचिरोलीसाठी बस पकडली व बसने ते गडचिरोलीत दाखल झाले. त्यानंतर ते वडसाकडे रवाना झाले. या संदर्भातील माहिती लोकमतला मिळाल्यावर त्यांच्याशी संवाद साधला. तर ते म्हणाले. आपण ग्रामीण भागातून पुढे आलेला कार्यकर्ता आहो. मातीशी आपले नाते अजुनही कायम आहे. पद येतील व जातील. आपल्या जीवनशैलीत कोणताही बदल होऊ न देता लोकांच्या समोर आपण गेलो पाहिजे, ही आपली कायम भूमिका राहिली आहे. त्यामुळे मी अनेकदा एसटीने प्रवास करूनच जातो. या प्रवासादरम्यान सर्वसामान्य नागरिक सहप्रवासी असतात. साहेब तुम्ही एसटीने कसे, असे ते आश्चर्याने विचारतात. एसटी विषयीच्या अडचणीही ते सांगतात, असे ते म्हणाले. अलिकडच्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर निवडून आलेला पदाधिकारी एसटीने प्रवास करीत नाही. असा अनुभव असताना क्रिष्णा गजबे यांचा हा एसटीचा प्रवास सामान्य प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का देणारा आहे.