शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत राकाँचे साखळी उपोषण

By admin | Updated: January 23, 2016 01:36 IST

सन २००५ च्या नियमानुसार वनहक्क पट्टे मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केलेल्या सर्व आदिवासी व गैरआदिवासी

प्रमुख मागणी : प्रस्ताव सादर केलेल्या अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे द्याअहेरी : सन २००५ च्या नियमानुसार वनहक्क पट्टे मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केलेल्या सर्व आदिवासी व गैरआदिवासी अतिक्रमणधारकांना तत्काळ वनहक्क पट्टे द्यावेत, या मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी साखळी उपोषण करण्यात आले. उपोषणापूर्वी अतिक्रमणधारकांच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. दरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यात यावे, मुदतीनंतरही सादर केलेले वनहक्क दावे मंजूर करावे व गैरआदिवासींना वनहक्क पट्टे मिळण्यासाठीची तीन पिढ्यांच्या अटीमध्ये शिथीलता आणावी, या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली काढू, असे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम व उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी राकाँचे अहेरी तालुकाध्यक्ष जहीर हकीम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, येर्रावार, सुरेंद्र अलोणे, ग्रा.पं. सदस्य सुधाकर आत्राम, लक्ष्मण डोंगरे, पांडु गावडे, बुचय्या चडमेक, सदू पेंदाम, लक्ष्मी पोदाडी, भगवान मडावी, रंगा आलाम, नारायण चालुरकर, कमला वेलादी, बंडू झाडे, नारायण आत्राम, मधुकर झाडे, सरपंच अंजना मडावी, सुरेश वेलादी, व्यंकटेश झोडे, समय्या टेकाम, लिंगू वेलादी, पोचू आत्राम, रंगा तलांडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)