शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरचीतून धान खरेदीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय कोरची अंतर्गत मसेली व कोरची येथील ...

ठळक मुद्देमहामंडळाचा खरीप हंगाम : कोरची, मसेली येथील खरेदी केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय कोरची अंतर्गत मसेली व कोरची येथील आविका संस्थांच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून प्रत्यक्ष धान खरेदीचा शुभारंभ १९ नोव्हेंबर रोजी मंगळवारला करण्यात आला.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कोरचीच्या वतीने आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन तहसीलदार भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आविका संस्थेचे सभापती श्यामलाल मडावी, महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक चौधरी, आविका संस्थेचे संचालक मनोज अग्रवाल, भजन मोहुर्ले, विठ्ठल शेंडे, भिकम फुलकुवर, बिरसू कमरो, देवालू कपूरडेहरिया, प्रल्हाद चांग, आसाराम सांडिल, शंभू घावडे, बाळकृष्ण मारगाये, दिवाकर शेंडे यांच्यासह हमालवर्ग उपस्थित होता.आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने कोरची तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात कोटरा, कोरची, बेतकाठी, मर्केकसा, बेडगाव, बोरी, मसेली, कोटगूल आदी धान खरेदी केंद्र मंजूर केले असून तालुक्यात दोन ते तीन केंद्रावर खरेदीचा शुभारंभ मंगळवारी झाला. उर्वरित धान खरेदी केंद्र बुधवारी व गुरूवारला सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.आविकास संस्थांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने खरेदी केंद्र मंजूर होऊनही संस्थांनी धान खरेदीचे काम सुरू केले नव्हते. दरम्यान महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी थकीत कमिशनची रक्कम आविका संस्थेच्या खात्यात वळते केले आहे. कुरखेडा तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू होणार आहेत.‘अ’ प्रतीच्या धानाला १८३५ रुपये भावराज्य शासनाने यावर्षी आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत ‘अ’ प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ८३५ रुपये व ‘क’ प्रतीच्या धानाला १ हजार ८१५ रुपये भाव दिला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांवर धानाची आवक वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड