शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडातील ध्वजाराेहण कार्यक्रमात नियोजनाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

याबाबत येथील काही जागरूक नागरिकांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी नमिता बांगर यांच्याकडे विचारणा केली असता २६ जानेवारी व १५ ऑगस्टलाच ...

याबाबत येथील काही जागरूक नागरिकांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी नमिता बांगर यांच्याकडे विचारणा केली असता २६ जानेवारी व १५ ऑगस्टलाच देशभक्ती उफाळून येते का? नगरातील १० झेंडे फडकले नाही तर कोणता असा फरक पडला? असे उलट सुनावल्याचे सदर नागरिकांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. नगर पंचायतचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनीही काही ऐकून न घेता हा विषय येथेच थांबवा, असे म्हणत प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण न करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ईश्वर ठाकरे, अनिकेत आकरे, मुकेश माकडे, एजाज शेख, तलत सय्यद, भावेश मुंगणकर, चेतन मडावी, साईनाथ कोंडावर व युवकांनी दिला आहे.

याबाबत माजी प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनासंदर्भात पाच दिवसांपूर्वी मुख्याधिकाऱ्यांची भेट होऊ शकली नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचित करून नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींना विश्वासात घेऊन शहरातील ध्वजारोहण कार्यक्रम करण्यास सांगितले होते. मात्र सूचनेची दखल घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

(बॉक्स)

अधिकारी निरूत्तर

दरम्यान या प्रकरणाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी नमिता बांगर यांच्याकडे भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी कॉलच स्वीकारला नाही. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने अशी भूमिका का घेतली हे कळू शकले नाही. पदाधिकारी, नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर नागरिकांचा रोष ओढवला नसता, अशा प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहेत.