गाेंधळलेल्या काेराेनाबाधितांना मार्गदर्शनाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:49+5:302021-04-20T04:37:49+5:30

बाॅक्स रुग्णांसाेबत संपर्क साधता येईल अशी यंत्रणा असावी काेराेना वाॅर्डात रुग्णाच्या नातेवाइकाला साेबत राहू दिले जात नाही. काही रुग्णांकडे ...

Lack of guidance to the affected carnivores | गाेंधळलेल्या काेराेनाबाधितांना मार्गदर्शनाचा अभाव

गाेंधळलेल्या काेराेनाबाधितांना मार्गदर्शनाचा अभाव

बाॅक्स

रुग्णांसाेबत संपर्क साधता येईल अशी यंत्रणा असावी

काेराेना वाॅर्डात रुग्णाच्या नातेवाइकाला साेबत राहू दिले जात नाही. काही रुग्णांकडे माेबाइल राहत नाही. तसेच गंभीर स्थितीतील रुग्णांकडे माेबाइल असला तरी ताे बाेलू शकत नाही. त्यामुळे त्याची स्थिती कशी आहे, याची माहिती नातेवाइकांना कळत नाही. रुग्णासाेबत नातेवाईक संपर्क साधू शकतील किंवा त्याची स्थिती कळू शकेल ही यंत्रणा असण्याची गरज आहे.

जिल्ह्यात काही काेविड केअर सेंटर तसेच रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रत्येक रुग्णालयाची जबाबदारी एका कर्मचाऱ्यावर साेपवावी. दूरध्वनी क्रमांक किंवा माेबाइल क्रमांक सार्वजनिक करावा जेणेकरून नागरिक रुग्णालयातील स्थिती जाणू शकतील.

वाॅररूमची गरज

काेराेनाचे संकट लक्षात घेता काही जिल्ह्यांमध्ये वाॅररूम तयार करण्यात आले आहेत. असे वाॅररूम गडचिराेली जिल्ह्यातही असण्याची गरज आहे.

हाेम आयसाेलेशन असणाऱ्यांकडे विशेष लक्ष ठेवण्याची गरज

सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णाला घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. या रुग्णाला काही डाॅक्टरांचे माेबाइल क्रमांक दिले जातात. या डाॅक्टारांशी संपर्क न झाल्यास वाॅररूमला संपर्क साधता येईल.

Web Title: Lack of guidance to the affected carnivores