लाेहा व कल्लेड येथे मूलभूत साेयींचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:35 IST2021-04-10T04:35:46+5:302021-04-10T04:35:46+5:30

झिंगानूर : परिसरातील लोहा व येडसिली गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे या गावाचा विकास झाला नाही. गावात ...

Lack of basic facilities at Laha and Kalled | लाेहा व कल्लेड येथे मूलभूत साेयींचा अभाव

लाेहा व कल्लेड येथे मूलभूत साेयींचा अभाव

झिंगानूर : परिसरातील लोहा व येडसिली गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे या गावाचा विकास झाला नाही. गावात मूलभूत सोयीसुविधा पोहोचविण्याकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

लोहा गावाचा समावेश अहेरी तालुक्यात आहे तर येडसिली गाव सिरोंचा तालुक्यात येते. दोन्ही गावे झिंगानूर परिसरात आहेत. परंतु या गावांमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही गावाच्या विकासाला गती मिळाली नाही. लोहा गावात १०० टक्के आदिवासी समाज आहे. गावातील नागरिकांना नियमित आरोग्य सेवा मिळत नाही. गावातील नागरिक शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येते. येथे पक्के रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्याच्या सोयीचा अभाव आहे.

लोहा गावात जुन्या काळातील एक विहीर आहे. १९८३ मध्ये या गावात एक हातपंप बसविण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये बोअरवेल खोदकाम करण्यात आले. परंतु या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले नाही.

Web Title: Lack of basic facilities at Laha and Kalled