शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

माेबाईल कव्हरेजकरिता मुले चक्क पाण्याच्या टाकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

एटापल्ली तालुक्यात फक्त बीएसएनएलची माेबाईल सेवा आहे. तेही तालुक्यातील काही माेजक्याच गावात कव्हरेज मिळते. कव्हरेजची अडचण असली तरी, आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. मग कसे कव्हरेज मिळेल, याकरिता मुले वाट्टेल ती शक्कल लढवतात.   एटापल्लीपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या येमली गावात पाण्याच्या टाकीवर कव्हरेज मिळण्याकरिता बांबू बांधून राऊटर बसविले आहे. 

ठळक मुद्देयेमलीतील प्रकार, दुर्घटना हाेण्याची शक्यता

लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : बातमीचे शीर्षक वाचून विश्वास बसणार नाही; परंतु मोबाईल कव्हरेजकरिता मुले चक्क गावातील पाण्याच्या टाकीवर, अगदी शेवटच्या मजल्यावर चढत आहेत. हा धक्कादायक प्रकार बघून आश्चर्याचा धक्का बसताे. अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. एटापल्ली तालुक्यात फक्त बीएसएनएलची माेबाईल सेवा आहे. तेही तालुक्यातील काही माेजक्याच गावात कव्हरेज मिळते. कव्हरेजची अडचण असली तरी, आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. मग कसे कव्हरेज मिळेल, याकरिता मुले वाट्टेल ती शक्कल लढवतात.   एटापल्लीपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या येमली गावात पाण्याच्या टाकीवर कव्हरेज मिळण्याकरिता बांबू बांधून राऊटर बसविले आहे. रविवारी येमली गावात अल्पवयीन सहा मुले-मुली चक्क पाण्याच्या टाकीवर चढल्याचे पहायला मिळाले. यापैकी एक मुलगी व मुलगा पाण्याच्या टाकीच्या सर्वात उंच भागावर चढले होते. सदर प्रतिनिधी फोटो घेत असल्याचे लक्षात येताच ते सर्वजण घाईत खाली उतरू लागले. टाकीवर कशाला चढले होते? असा प्रश्न विचारला असता, सर्व मुले घाबरली. काहीच उत्तर न देता ती लगेच पसार झाली. परंतु हा सर्व प्रकार धक्कादायक होता. 

टाकीला संरक्षक भिंतीची गरज शहरातील पाण्याच्या टाक्यांना संरक्षक भिंत किंवा काटेरी कुंपण केलेले असते. ग्रामीण भागातील पाण्याच्या टाक्या मात्र माेकळ्याच राहतात. त्यामुळे काेणीही सहज पाण्याच्या टाकीवर चढू शकतो. ग्रामीण भागातील टाक्यांनाही संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. तीन दिवसांपासून एटापल्ली येथे मोबाईल कव्हरेजची समस्या आहे. दिवसातून अनेकवेळा कव्हरेज जाते. बीएसएनएलने सेवेत सुधारणा करण्याची गरज आहे.

- सदर प्रतिनिधीने सर्व प्रकार सरपंच ललिता मडावी यांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी गावातील काही युवकांनी पाण्याच्या टाकीवर मोबाईल कव्हरेजकरिता बांबू बांधल्याचे सांगितले व येथून पुढे पाण्याच्या टाकीवर लहान मुले चढणार नाहीत, याची दक्षता घेऊ, असे सांगितले. 

 

टॅग्स :Mobileमोबाइल