शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चहाच्या आड खर्रा विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST

कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शहरातील पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तरी शहरात सहजतेने खर्रा उपलब्ध होत आहे. सदर बाब लक्षात येताच शहरातील विविध ठिकाणातील विक्री होणाऱ्या दुकानांची झडती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर प्रशासनाच्या तंबाखूविरोधी पथकाने शहरात गस्त घातली असता शहरात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात खर्रा विक्री होत असल्याची बाब उघडकीस आली. न. प. च्या पथकाने चार चहा विक्रेत्यांच्या टपरीची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. याप्रकरणी त्यांच्याकडून दोन हजारांचा दंड वसूल करून पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची तंबी दिली.कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शहरातील पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तरी शहरात सहजतेने खर्रा उपलब्ध होत आहे. सदर बाब लक्षात येताच शहरातील विविध ठिकाणातील विक्री होणाऱ्या दुकानांची झडती घेतली. यावेळी चहा विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा आढळून आला. संपूर्ण माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.विशेष म्हणजे, शासकीय इमारतीच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असून सुद्धा महिला व बाल रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्या जात आहे. या परिसरातील तीन दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनात ही कारवाई तंबाखूविरोधी पथकातील बबू शेख, भूपेंद्र मंदिरकर, मधुकर लटारे यांनी केली. यावेळी मुक्तिपथचे तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.दारूबंदीची ओवाळणीअहेरी : स्थानिक पोलीस ठाण्यात महिला संघटनेतर्फे ‘राखी विथ खाकी’ उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत पोलिसांना राखी बांधून महिलांनी दारूबंदीची ओवाळणी मागितली. अहेरी शहर दारुमुक्त करण्यासाठी महिला संघटना वॉर्ड, मोहल्यातील समिती सदस्य परिश्रम घेत आहे. महिलांच्या पुढाकारातून व पोलिसांच्या सहकार्याने काही प्रमाणात अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्यात यश आले आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी अवैध दारू विक्री सुरु आहे. त्यामुळे शहरातून दारू हद्दपार करा, अशी मागणी अहेरी शहरातील महिलांनी पोलिसांकडे राखी बांधून केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, एपीआय शिंदे, पीएसआय विनायक दळस पाटील यांच्यासह मुक्तिपथचे तालुका संघटक केशव चव्हाण उपस्थित होते.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी