शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाने शिकविले काॅस्ट कटिंग, किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST

काेराेनामुळे मागील दीड वर्षापासून अर्थव्यवस्थेतील उलाढाल मंदावली आहे. दीड वर्षाच्या कालावधीत अनेक वेळा निर्बंध लादण्यात आले आहेत. बाजारपेठ काही ...

काेराेनामुळे मागील दीड वर्षापासून अर्थव्यवस्थेतील उलाढाल मंदावली आहे. दीड वर्षाच्या कालावधीत अनेक वेळा निर्बंध लादण्यात आले आहेत. बाजारपेठ काही दिवस सुरू व काही दिवस बंद राहत असल्याने याचा माेठा फटका सर्वसामान्य नागरिक, छाेटे व्यावसायिक, मजुरांना बसला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील नागरिकांना लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला आहे. उत्पन्न कमी झाल्याने खर्चात कपात केल्याशिवाय दुसरा काेणताही पर्याय शिल्लक नाही. प्रत्येक बाबीचे नियाेजन करून खर्च केला जात आहे. सद्य:स्थितीत आवश्यक असलेल्या वस्तूंचीच खरेदी केली जात आहे. अनावश्यक खर्च पुढे ढकलला जात आहे.

बाॅक्स

कुठे कुठे केली काॅस्ट कटिंग

१) लग्न व इतर समारंभांना उपस्थित राहण्यासाठी नागरिक स्वतंत्र ड्रेस खरेदी करीत हाेते. मात्र या वर्षी कार्यक्रम बंद आहेत. जे कार्यक्रम हाेत आहेत, ते कमी नागरिकांच्या उपस्थितीत उरकले जात आहेत. त्यामुळे महागडे ड्रेसेस खरेदी करण्याची गरज उरली नाही. आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केले जात आहेत.

२) घर सजावटीच्या वस्तूंवर दरवर्षी हजाराे रुपये खर्च हाेत हाेते. या वर्षी मात्र घरसजावटीची कामे अनेकांनी लांबवणीवर टाकली आहेत.

३) ब्यूटी पार्लरमधील वेगवेगळे मेकअप करण्यावर महिलांचे हजाराे रुपये खर्च हाेत हाेते. काेराेनाकाळात ब्यूटी पार्लर बंद हाेते. कार्यक्रमही बंद हाेते. त्यामुळे महागडा मेकअप लावण्याची गरज राहिली नसल्याने यातून बराच खर्च वाचला आहे. पुरुष वर्गानेही चेहऱ्याचा मसाज बंद केला. तसेच शेव्हिंगही घरीच उरकली जात आहे.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

काेट

हाॅटेलिंग थांबल्याने पाच हजार वाचले

महिन्यातून किमान एकदा तरी हाॅटेलमध्ये जेवण केले जात हाेते. तसेच बऱ्याच वेळा हाॅटेलमधील पार्सल बाेलाविली जात हाेती. यात महिन्याचे किमान पाच हजार रुपये खर्च हाेत हाेते. काेराेनाच्या कालावधीत हाॅटेल बंदच हाेते. तसेच गर्दीत जाण्यास भीती वाटते. तसेच काेेराेनाने घरीच जेवण करायची सवय लावली.

- राेशनी कस्तुरे

काेट

प्रत्येक महिन्याचे नियाेजन

काेराेनापूर्वी असे आर्थिक संकट कधीही आले नव्हते. हातात पैसा खेळता राहत हाेता. त्यामुळे संसारासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नियाेजन करण्याची गरजच राहत नव्हती. आता मात्र कमी खर्चात संसार चालवायचा आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे नियाेजन केले जात आहे. नियाेजनाबाहेरच्या वस्तू सहजासहजी खरेदी केल्या जात नाहीत.

मनीषा जवादे

काेट

राेजगार बुडाल्याने खर्चात कपात केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. काेराेनाच्या या संकटात केवळ जगण्यावर भर दिला जात आहे. अनावश्यक खर्चांना फाटा देण्यात आला आहे. जुनी बचत संपत येत आहे. त्यामुळे भविष्यात जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- कविता भाेयर

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

वर्तूळ

महागडे कपडे खरेदी थांबली.

चारचाकी वाहनांचा वापर केला कमी.

हाॅटेलची पार्सल केली बंद.

ब्यूटी पार्लरमध्ये जाणे झाले बंद.

टीव्ही चॅनेलची संख्या केली कमी.

पुरुषांची शेव्हिंग घरीच.