शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

महागाव-अहेरी मार्गाचा प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:35 IST

महागाव (बु.) : महागाव-अहेरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन ...

महागाव (बु.) : महागाव-अहेरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अहेरी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर महागाव हे गाव आहे. महागाव परिसरातील नागरिकांना विविध कामे करण्यासाठी अहेरी येथे जावे लागते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ६ किमीचे अंतर पार करण्याकरिता अर्धा तास लागताे. महागाव-अहेरी मार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले; मात्र त्यानंतर रस्त्याची केवळ डागडुजी झाली. पक्की दुरुस्ती झाली नाही. महागाव मार्गावरून छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून अवजड वाहतूक केली जात आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले; मात्र अद्याप त्याची डागडुजी झाली नाही.

केवळ २ किमी मार्गाची डागडुजी केली; मात्र ५ किमी रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. मागील महिन्यात रस्त्याच्या बाजूला एक ट्रक फसला हाेता. सुदैवाने या ठिकाणी दुर्घटना घडली नाही. रस्त्याचे काम करताना निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाली. खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारक येथून घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या मार्गाची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी महागाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.