महागाव - अहेरी मार्गाचा प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST2021-02-23T04:54:37+5:302021-02-23T04:54:37+5:30

अहेरी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर महागाव हे गाव आहे. महागाव परिसरातील नागरिकांना विविध कामे करण्यासाठी अहेरी येथे जावे ...

The journey on the Mahagaon-Aheri route is tough | महागाव - अहेरी मार्गाचा प्रवास खडतर

महागाव - अहेरी मार्गाचा प्रवास खडतर

अहेरी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर महागाव हे गाव आहे. महागाव परिसरातील नागरिकांना विविध कामे करण्यासाठी अहेरी येथे जावे लागते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ६ किमीचे अंतर पार करण्याकरिता अर्धा तास लागताे. महागाव - अहेरी मार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर रस्त्याची केवळ डागडुजी झाली. पक्की दुरूस्ती झाली नाही. महागाव मार्गावरून छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून अवजड वाहतूक केली जात आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले. मात्र, अद्याप त्यांची डागडुजी झाली नाही.

केवळ २ किमी मार्गाची डागडुजी केली. मात्र, ५ किमी रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. मागील महिन्यात रस्त्याच्या बाजूला एक ट्रक फसला हाेता. सुदैवाने या ठिकाणी दुर्घटना घडली नाही. रस्त्याचे काम करताना निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाली. खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारक येथून घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या मार्गाची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी महागाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: The journey on the Mahagaon-Aheri route is tough