जनहितवादी युवा समितीचे अहेरीत ठिय्या आंदोलन

By Admin | Updated: March 8, 2017 02:15 IST2017-03-08T02:15:36+5:302017-03-08T02:15:36+5:30

सूरजागड लोहप्रकल्पासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी समिती व सूरजागड बचाव संघर्ष समिती तसेच पेसा, ग्रामसभा,

The Jana Bharti Yuva Samiti's Inhuman Movement | जनहितवादी युवा समितीचे अहेरीत ठिय्या आंदोलन

जनहितवादी युवा समितीचे अहेरीत ठिय्या आंदोलन

सूरजागड प्रकल्प : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहेरी : सूरजागड लोहप्रकल्पासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी समिती व सूरजागड बचाव संघर्ष समिती तसेच पेसा, ग्रामसभा, अहेरी जिल्हा कृती समिती यांच्या मार्फतीने अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन तसेच थालीनाद आंदोलन मंगळवारी करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जनहितवादी समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांनी केले.
सूरजागड परिसरातून लोहखनिज उत्खननासाठी ग्रामसभा व तालुक्यातील जनतेला विश्वासात घ्यावे, सूरजागड लोहप्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीची जागृती करावी, या परिसरातील जनतेला गौण वनोपजाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र सुरजागड लोहप्रकल्प झाल्यास हा रोजगार नष्ट होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उभारताना होणाऱ्या नुकसानीची भरपाई व व्यवस्थापन करण्यासंदर्भात तरतुदी होणे आवश्यक आहे. जंगलातील वन्यजीवांचे वास्तव्य धोक्यात येणार नाही.
याकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे. क्रश व स्टील प्लान्ट एटापल्ली, भामरागड, आलापल्ली तसेच अहेरी परिसरात उभारण्यात यावा, लोहप्रकल्प, क्रश प्लान्ट व स्टील प्लान्टमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावे, लोहप्रकल्पातून जमा होणाऱ्या एकूण रॉयल्टीपैकी सात टक्के रॉयल्टी दुर्गम भागाच्या विकासाकरिता खर्च करावी, आदी मागण्यांसाठी थालीनाद आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The Jana Bharti Yuva Samiti's Inhuman Movement