शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

तुमच्या ‘डीपी’वरील फाेटाेचे माॅर्फिंग तर हाेत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 5:00 AM

सायबर माॅर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून अवमानना होईल, अशा प्रकाराने माॅर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि महिलांनो डीपी ठेवताना सजग राहण्याची गरज आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या आवडीचे फोटो, मते मांडण्याची, लोकांशी जोडण्याची संधी  मिळाली आहे. एकीकडे सोशल मीडियाचे स्वातंत्र्य अनुभवत असतानाच दुसरीकडे मात्र, महिलांना सावधगिरीने वागावे लागत आहे. महिला, मुलींनो तुमच्या डीपीवरील छायाचित्राचे मॉर्फिंग तर होत नाही ना, हे पाहण्याची गरज असून अधिक सावध राहण्याची गरज आहे. मनोरंजनाचे साधन म्हणून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपचा वापर वाढल्याने सायबर गुन्हेगारांना आयतीच मेजवानी मिळत आहे. त्यातून मुली, महिलांच्या छायाचित्रांच्या मॉर्फिंगचे प्रकार घडू लागले आहेत. सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोचा गैरवापर करून त्रास देणे, बनावट अकाउंट काढून अश्लील पोस्ट टाकणे, इन्स्टाग्रामवरील फोटो चोरून मॉर्फ करत त्रास देणे, सोशल मीडियावर मोबाइल क्रमांक टाकणे, व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून त्रास देणे, अशा प्रकारच्या त्रासाला महिलांना सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालले असल्याने युवतींनी त्यापासून सावध असण्याची गरज आहे.

माॅर्फिंग म्हणजे काय?सायबर माॅर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून अवमानना होईल, अशा प्रकाराने माॅर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि महिलांनो डीपी ठेवताना सजग राहण्याची गरज आहे.

असा होईल गुन्हा दाखलमाॅर्फिंग म्हणजे मूळ चित्रामध्ये बेकायदेशीरपणे बदल करणे, बनावट खातेधारक महिलांची चित्रे डाउनलोड करून त्यामध्ये बदल करून ती दुसऱ्या वेबसाइटवर पुन्हा पोस्ट करतात. असे करणे हा आयटी ॲक्ट २००० अंतर्गत गुन्हा आहे. भादंविच्या कलमाखालीही गुन्हेगाराला अटक होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये भादंविचे कलम ३५४, ३५४ ड व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ ड अन्वये गुन्हा दाखल केला जातो.

-    फेसबूकवरील छायाचित्रांना सर्वाधिक धाेका राहते. त्यामुळे फेसबूक वापरकर्त्याने स्वत:ची प्राेफाईल लाॅक करून ठेवावी, जेणे करून मित्रांव्यतिरिक्त इतर व्यक्ती आपले फाेटाे पाहू शकणार नाही.

 

टॅग्स :FacebookफेसबुकMobileमोबाइल