शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बिण दगड हलविल्याचे चौकशीत निष्पन्न

By admin | Updated: July 13, 2015 01:53 IST

तालुक्यातील पालोरा येथील बन्सोड यांच्या जमिनीचे मोजमाप करून देताना भूकरमापक जाधव यांनी दुर्बिण दगड दुसऱ्या जागेवर हलविला असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.

आंदोलनाचा इशारा : भूकरमापकावर कारवाई करा
आरमोरी : तालुक्यातील पालोरा येथील बन्सोड यांच्या जमिनीचे मोजमाप करून देताना भूकरमापक जाधव यांनी दुर्बिण दगड दुसऱ्या जागेवर हलविला असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जाधव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पालोरा येथील शेतकरी बन्सोड यांनी भूमापक कार्यालयाकडे केलेल्या अर्जानुसार भूकरमापक जाधव यांनी २३ फेब्रुवारी २०१५ रोजी मोजणी करून दिली. मात्र लगतचे शेतकरी तान्हाजी चिलबुले, नत्थू जिभकाटे, प्रल्हाद मेश्राम, शीलाबाई चिलबुले, थूलकन्या मेश्राम यांना याबाबत कोणतेही नोटीस दिले नाही. त्याचबरोबर दुर्बिण दगड ५० मिटरने सरकवून लगतधारक कास्तरांची संपूर्ण जागा बन्सोड यांना मोजून दिली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. आदेशानुसार भूमीअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांच्या मार्फत २४ जून रोजी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन चौकशी करण्यात आली. यावेळी तलाठी नकाशानुसार सर्वे क्र. १३७ मध्ये शेतात नमूद असलेला दुर्बिण दगड सर्वे क्र. १३९ च्या शेतात असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व प्रकार भूकरमापक जाधव यांनी जाणुनबुजून केला आहे. जमीन मापनानंतर बन्सोड व इतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाद निर्माण झाले होते. जाधव यांनी हे कृत्य आर्थिक लाभापोटी केले असल्याचा आरोप लगतधारक शेतकऱ्यांनी केला आहे.
अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून तान्हाजी चिलबुले, नत्थू जिभकाटे, प्रल्हाद मेश्राम, शीला चिलबुले, थूलकन्या मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जाधव यांनी यापूर्वी केलेल्या इतरही जमिनींच्या सर्वेक्षणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)