शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकाची जि.प.मध्ये चौकशी

By admin | Updated: August 26, 2016 01:10 IST

२०१३ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागात

बोगस बदल्यांचे प्रकरण : शिक्षण विभागाच्या फाईली तपासल्यागडचिरोली : २०१३ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागात २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ७३ बदल्यांच्या नस्त्याच गायब असल्याने या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणात शिक्षण विभागाचे लिपीक रूपेश शेडमाके यांना २४ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान गुरूवारी गडचिरोली पोलिसांनी रूपेश शेडमाके यांना गडचिरोली जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात नेऊन तेथील संपूर्ण फाईली व बदल्या संदर्भातील सर्व दस्तावेज तपासले. जिल्हा परिषदेत पोलीस या लिपिकाला घेऊन आले असताना बघ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली होती. बराच काळ येथे लिपिकाची चौकशी पोलिसांनी केली. या प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, तत्कालीन पदाधिकारी व बोगस नस्त्या टाकून बदल्या करवून घेणारे शिक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. जवळजवळ तीन वर्षानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली व एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला. (जिल्हा प्रतिनिधी)