शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२४ घरकुलांना ऐनवेळी ठरविले अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 01:27 IST

अहेरी पंचायत समिती अंतर्गत आलापल्ली ग्रामपंचायतीमध्ये इंदिरा आवास घरकूल योजनेंतर्गत २४ एप्रिल २०१५ रोजी घरकूल लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली.

आलापल्लीतील प्रकार : लाभार्थ्यांचे संसार सुरू आहे उघड्यावर आलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत आलापल्ली ग्रामपंचायतीमध्ये इंदिरा आवास घरकूल योजनेंतर्गत २४ एप्रिल २०१५ रोजी घरकूल लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली. मात्र या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या २४ घरकुलांना ऐनवेळी अपात्र ठरविण्यात आले. घरकूल मंजूर झाले म्हणून अनेक लाभार्थ्यांनी घर बांधकाम करण्यासाठी जुने घर जमीनदोस्त केले. मात्र आलापल्ली ग्रामपंचायतीच्या या कारभारामुळे आता अनेक घरकूल लाभार्थ्यांचे संसार उघड्यावर सुरू असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. अहेरी पंचायत समितीअंतर्गत आलापल्ली, ग्रामपंचायतीमध्ये इंदिरा आवास घरकूल योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात एकूण १२६ घरकुलांना पात्र ठरवून त्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ७७, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी ३५ व अल्पसंख्यांकासाठी १४ घरकुलांचा समावेश होता. या १२६ प्रस्तावित पात्र घरकुलांची यादी आलापल्ली ग्रामपंचायतीने अहेरी पंचायत समितीला सादर केली. यापूर्वीच जिल्हा परिषदेमार्फत घरकूल मंजूर असतानाही आता २४ घरकूल ऐनवेळी अहेरी पंचायत समिती व जिल्हा परिषद गडचिरोली यांनी अपात्र दाखविले आहे.यापूर्वी मंजूर घरकूल लाभार्थ्यांच्या यादीमध्ये सदर २४ लाभार्थ्यांचे नावे समाविष्ट होती. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी नवीन घरकूल बांधकाम करण्यासाठी सुरुवात केली आहे. तर काही लाभार्थ्यांनी जुने झोपडीवजा घर जमीनदोस्त केले आहे. मात्र आता ऐनवेळी या २४ घरकूल लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आल्याने अनेक लाभार्थ्यांचा संसार उघड्यावर सुरू झाला आहे. (वार्ताहर)