इंदाराम येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:32 IST2021-02-08T04:32:08+5:302021-02-08T04:32:08+5:30

अहेरी : युवा बिरसा मुंडा क्रिकेट क्लबच्यावतीने इंदाराम येथे ग्रामीण टेनिस बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे ...

Inauguration of cricket tournament at Indaram | इंदाराम येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

इंदाराम येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अहेरी : युवा बिरसा मुंडा क्रिकेट क्लबच्यावतीने इंदाराम येथे ग्रामीण टेनिस बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती भास्कर तलांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य अजय नैताम, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, माजी उपसरपंच वैभव कंकडालवार, ग्रा.पं.सदस्य गणेश आलाम, शाकिर शेख, सपना कोरेत, वर्षा पेंदाम, शालिनी कांबळे, जया पेंदाम, जया तेलगे, कविता सोयाम, पोलीस पाटील सदाशिव दुर्गे, प्रभाकर पेंदाम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मण आत्राम तर आभार राजू आत्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळचे अध्यक्ष प्रवीण कोरेत, उपाध्यक्ष सुनील मडावी, सचिव अजय तलांडे, कालिदास आत्राम, अमोल आत्राम, उमेश कोरेत, अरुण आलम, रितेश कोरेत, करण वेलादी, अतिक्ष नैताम, राजू आत्राम, अक्षय बतुलवार, संतोष सिडाम, प्रभाकर पेंदाम, लालू आलम, लक्ष्मण आत्राम, रामशाई आत्राम, अजय कुमरे, विशाल सडमेक, नीलेश मडावी, राकेश आत्राम, राकेश सडमेक, शेखर मडावी व गावातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Inauguration of cricket tournament at Indaram