शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरने मतदान प्रक्रियेला झाली मदत

By admin | Updated: October 15, 2014 23:17 IST

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने दोन हेलिकॉप्टरची मदत घेतली. हेलिकॉप्टरमुळे दुर्गम भागात पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याचे

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने दोन हेलिकॉप्टरची मदत घेतली. हेलिकॉप्टरमुळे दुर्गम भागात पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याचे काम सुलभपणे करता आले. तसेच मतदान झाल्यानंतर या पार्ट्यांना सुरक्षितपणे अहेरी मुख्यालयात आणण्याचेही काम करण्यात आले. नक्षलग्रस्त अहेरी विधानसभा मतदार संघात २८६ मतदान केंद्रांपैकी ९७ मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील, १०७ मतदान केंद्र हे संवेदनशील होते. या मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी पोहोचविण्यासाठी मोठा सुरक्षा बंदोबस्त ठेवावा लागत होता. मात्र यावेळी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आल्याने पोलीस प्रशासनाला हे काम अतिशय सुलभपणे करता आले. अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर, भामरागड तालुक्यातील लाहेरी यासारख्या संवेदनशील भागात पोलिंग पार्टीला पोलिसांनी हेलिकॉप्टरद्वारे पोहोचविले. नक्षलग्रस्त भागातील मतदारांनाही सुरक्षितपणे मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे काम प्रशासनानेच यावेळी केले. भामरागड तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम गावातील मतदार आदल्या दिवशीपासूनच स्थानिक पोलीस ठाण्यात मुक्कामी आणण्यात आले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. एटापल्ली तालुक्याच्या अनेक गावातून आज मतदान केंद्रावर नेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नदी व नाले ज्या ठिकाणी पार करून मतदान केंद्रावर पोहोचायचे आहे. तेथे डोंग्याचीही व्यवस्था प्रशासनाने केली होती. मतदान प्रक्रिया पार पाडत असतांना आज घोट परिसरातील मक्केपल्ली भागात पोलीस पार्टीच्या मार्गावर नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात एक जवान जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले. चापलवाडा मतदान केंद्रावरून ईव्हीएम मशीन घेऊन परत येत असतांना नक्षलवाद्यांनी मक्केपल्ली जंगलात सायंकाळी ५ वाजता ही घटना केली. मात्र हेलिकॉप्टरमुळे जखमी जवानाला तत्काळ मदत मिळाली व पोलीस पार्टी सुरक्षितपणे ईव्हीएम घेऊन पोहोचली. लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला नव्हता.