शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गुरूजी, कर्जाचे हप्ते केव्हा देता!

By admin | Updated: September 16, 2014 23:43 IST

शासनाकडून प्रशासन गतिमान करण्याचा कांगावा होत असला तरी याला अनेक शासकीय कार्यालये अपवाद आहेत. शासकीय कार्यालयातील दिरंगाईचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे.

पं.स. कार्यालयाकडून दिरंगाई : गुरूजींचे खणखणताहेत भ्रमणध्वनीगडचिरोली : शासनाकडून प्रशासन गतिमान करण्याचा कांगावा होत असला तरी याला अनेक शासकीय कार्यालये अपवाद आहेत. शासकीय कार्यालयातील दिरंगाईचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. येथील पंचायत समिती कार्यालयातील लेखा विभागाच्या दिरंगाईपणामुळे शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे ‘गुरूजी, कर्जाचे हप्ते केव्हा देता’ अशा वक्तव्यांचे भ्रमणध्वनी अनेक शिक्षकांना बँकांच्या अधिकाऱ्यांकडून येत आहे. पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांचे फोन वारंवार शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना येत असल्याची माहिती अनेक शिक्षकांनी ‘लोकमत’ला दिली आहे. गडचिरोली शहरातील तसेच तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अनेक राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून गृहकर्ज तसेच वाहनकर्ज घेतले आहे. सदर कर्ज घेताना प्रस्तावासोबत वेतन देयकही जोडण्यात आले आहे. या कर्जाच्या हप्त्याची भरपाई थेट दरमहा वेतनातून केली जाते. यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडून कर्जधारक कर्मचाऱ्यांच्या संबंधीत हप्त्याच्या रक्कमेचा डीडी बँकांना पाठविला जातो. मात्र सदर बँकांच्या कर्जाच्या हप्त्याचे डिमांड ड्राप्ट पाठविण्यासाठी पंचायत समितीकडून विलंब होत आहे. यामुळे कर्जाच्या हप्त्यासाठी अनेक शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी वारंवार खणखणत आहेत. मार्च एन्डींगच्यावेळी बँकांच्या व्यवहारामध्ये प्रचंड गती आलेली असते. वर्षभराचा हिशोब अद्यावत करण्यासाठी बँकांचे अधिकारी व कर्मचारी कामाला जोमात भिडलेले असतात. मात्र अशाही वेळी पंचायत समितीकडून कर्जधारक शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे हप्त्याच्या रक्कमाचे डिमांड ड्राप्ट वेळेवर पाठविल्या जात नाही. त्यामुळे मार्च एन्डींगच्या कालावधीत कर्जधारक कर्मचाऱ्यांना बँकांच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे वारंवार विचारणा केली जाते. पं. स. प्रशासनाने या कारभारात सुधारणा करण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)