शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव

By admin | Updated: May 16, 2016 01:26 IST

वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा व गेल्या चार-पाच दिवसांपासून तब्बल सहा तास भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या आरमोरी येथील भाजप पदाधिकारी व शेकडो नागरिकांनी

आरमोरी : वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा व गेल्या चार-पाच दिवसांपासून तब्बल सहा तास भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या आरमोरी येथील भाजप पदाधिकारी व शेकडो नागरिकांनी रविवारी येथील वीज वितरण कंपनीच्या पॉवर हाऊसमध्ये जाऊन कनिष्ठ अभियंता बोरकर यांना घेराव घातला. सध्या मे महिना सुरू असून आरमोरी शहरात प्रचंड उष्णतामान आहे. अशा परिस्थितीत मागील चार-पाच दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. रात्री सुध्दा अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत आहे. परिणामी येथील पाणी पुरवठा योजना ठप्प पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. खंडीत वीज पुरवठा व होणारे भारनियमनाला त्रस्त झालेल्या संतप्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कनिष्ठ अभियंता बोरकर यांना घेराव घातला. दरम्यान कनिष्ठ अभियंता बोरकर यांनी आरमोरी शहरात दररोज सहा तास भारनियमन असल्याचे सांगितले. यावर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारनियमन करण्यात येणार असल्याची माहिती जाहिररित्या दिली नाही. खंडीत वीज पुरवठ्याची समस्या तत्काळ निकाली काढावी, तसे भारनियमन बंद करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. सदर समस्या मार्गी न लागल्यास वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. घेराव घातला असल्याची माहिती मिळताच आरमोरीचे प्रभारी ठाणेदार बाळासाहेब नरवटे, पोलीस उपनिरिक्षक पंकज दाभाळे, राजगडे हे घटनास्थळी दाखल झाले. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, युगल सामृतवार, स्वप्नील धात्रक, अंकूश खरवडे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)थकीत वीज बिलामुळे भारनियमनआरमोरी शहरात वीज बिलाची एकूण ८० टक्के वसुली झाली आहे. १०० टक्के वसुली झाली नसल्याचे कारण पुढे करून वीज वितरण कंपनीच्या वतीने भारनियमन केल्या जात आहे. लगतच्या इतर तालुक्यात भारनियमन नसताना केवळ आरमोरी शहर भारनियमन कसे काय असा सवालही भाजप पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांना केला. यावर आम्हाला वरिष्ठ स्तरावरून भारनियमन करण्याच्या सूचना आहेत, असे बोरकर यांनी सांगितले.कार्यकारी अभियंत्याशी संपर्क नाहीत्यानंतर आरमोरी येथील कार्यकारी अभियंता आढाव यांना पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून भारनियमन व खंडीत पुरवठ्याबाबत जाब विचारण्यासाठी संपर्क साधला. मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद दाखवत होता.