शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गुळाने भरलेला ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:47 IST

दारू काढण्यासाठी वापरण्यात येणाºया गुळानी भरलेला ट्रक अहेरी तालुक्यातील बोरी येथे मुक्तीपथचे कार्यकर्ते व अहेरी पोलिसांनी पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसाडेचार लाखांचा २१ टन गूळ : मुक्तीपथ व अहेरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : दारू काढण्यासाठी वापरण्यात येणाºया गुळानी भरलेला ट्रक अहेरी तालुक्यातील बोरी येथे मुक्तीपथचे कार्यकर्ते व अहेरी पोलिसांनी पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील व्यंकटेश ट्रेडर्सकडून गडचिरोली जिल्ह्यातील बोरी मार्गे अहेरी येथील मनोज किराणा दुकानात ४.५० लाख रुपये किमतीचा अंदाजे २१ टन काळा गुळ आणत असल्याची गुप्त माहिती मुक्तीपथ व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यकर्त्यांना मिळाली. शुक्रवारी दुपारी एमपी २८ एच १०४३ या क्रमांकाचा ट्रक संशयीत आढळल्याने कार्यकर्त्यांनी हा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर ट्रक थांबविण्यात आला नाही. त्यानंतर पाठलाग करून मुक्तीपथचे कार्यकर्ते व गावकºयांनी सदर ट्रक दीना नदी जवळ पकडला. लगेच याची माहिती अहेरीचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांना देण्यात आली. त्यानंतर बीट हवालदार लक्ष्मण मोहुर्ले यांनी ट्रक ताब्यात घेऊन ट्रक अहेरी पोलीस ठाण्यात जमा केला. ट्रकची पाहणी केली असता यात काळा गुळ होता. काळ्या गुळवर बंदी असून त्याचा वापर परिसरात गुळाची दारू बनविण्यासाठी होतो. ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास अहेरीचे एसडीपीओ गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने, पोलीस उपनिरीक्षक तांबूसकर, चांगदेव कोळेकर, लक्ष्मण मोहुर्ले करीत आहे.