शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख निराधारांना शासनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत आहे. त्यामुळे अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सुध्दा अधिक आहे. जिल्हाभरातील सुमारे १ लाख २२ हजार ६६८ नागरिकांना अनुदानाचे वितरण केले जाते. लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरूच राहत असल्याने लाभार्थ्यांमध्ये वाढ होत राहते.

ठळक मुद्देकेंद्र व राज्याची मदत : अपंग, वृद्ध, विधवांना दिले जाते अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अपंग, निराधार, वयोवृध्द नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाच्या सामाजिक व न्याय विभागामार्फत अनुदान वितरणाच्या विविध योजना राबविल्या जातात. यातील बहुतांश योजनेंतर्गत मासिक एक हजार रुपये अनुदान दिले जाते. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ६२८ नागरिकांना अनुदान वितरित केले जात आहे.वृध्दापकाळामध्ये व्यक्तीचा गोळ्या औषधांवरील खर्च वाढतो. दुसरीकडे या वयात काम करणे शक्य होत नसल्याने उत्पन्नाचे पूर्ण स्त्रोत बंद होतात. परिणामी ज्यांचे हात स्वत:ची मुले, समाज व देशाचे भवितव्य घडविण्यासाठी झिजले, अशांना वृध्दापकाळात अतिशय हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. पैशाअभावी परावलंबी जीवन त्यांच्या वाट्यास येते. तसेच अपंग, विधवा महिलांनाही संपूर्ण जीवन संघर्ष करीत जगावे लागते. समाजातील या घटकांना थोडाफार आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागामार्फत या नागरिकांना मासिक अनुदान वितरित केले जाते. केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवितात. या योजनांमध्ये काही वाटा केंद्र शासन तर काही वाटा शासन राज्य शासन उचलून अनुदान उपलब्ध करून दिले जाते.गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत आहे. त्यामुळे अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सुध्दा अधिक आहे. जिल्हाभरातील सुमारे १ लाख २२ हजार ६६८ नागरिकांना अनुदानाचे वितरण केले जाते. लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरूच राहत असल्याने लाभार्थ्यांमध्ये वाढ होत राहते.हजार रुपये अनुदानाने निराधारांमध्ये आनंदमागील अनेक वर्षांपासून केवळ ६०० रुपये मासिक अनुदान दिले जात होते. वाढत्या महागाईमध्ये सदर अनुदान अतिशय कमी असल्याने अनुदान वाढवावे, अशी मागणी निराधार नागरिकांकडून केली जात होती. राज्य शासनाकडून २० आॅगस्ट २०१९ रोजी नवीन शासन निर्णय काढून सर्व योजनांतर्गतच्या निराधार व वृध्द नागरिकांचे अनुदान एक हजार रुपये केले आहे. ऑगस्टमध्ये निर्णय घेतला तरी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये काही नागरिकांच्या खात्यावर ६०० रुपये जमा झाले होते. त्यामुळे शासन वाढीव अनुदान देणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र डिसेंबर महिन्यात ज्या नागरिकांना अनुदान मिळाले आहे, त्यांना एक हजार रुपये प्रतीमाह अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदानात वाढ झाल्याने निराधार व वृध्द नागरिकांच्या चेहºयावर आनंद दिसून येत आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना