शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बिनागुंडा पहाडीवरचा गोरगा भामरागडात दाखल

By admin | Updated: August 28, 2016 01:39 IST

तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या बिनागुंडा पहाडीवरील गोरगाची झाडे भामरागडात

आठवडी बाजारात खरेदीसाठी लागली रांग : ५० ते १०० रूपये दराने होत आहे रोप व बियांची विक्रीरमेश मारगोनवार  भामरागडतालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या बिनागुंडा पहाडीवरील गोरगाची झाडे भामरागडात विक्रीसाठी आणली जात असून ही झाडे ५० ते १०० रूपये प्रती नग दराने विकली जात आहेत. वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष करणारे नागरिक मात्र गोरगाची झाडे स्वत: खरेदी करून त्यांचे संगोपण करण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. गोरगा झाडाच्या बुंद्यातून पाझरणाऱ्या द्रव्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो. या द्रव्यामुळे नशा चढत असल्याने गोरगा द्रव्य खरेदी करण्यासाठी मोठी रांग भामरागडात दिसून येते. भामरागड परिसरात ताडाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र गोरगाची झाडे फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. गोरगाची झाडे मोठ्या प्रमाणात लाहेरी व बिनागुंडा परिसरात आढळून येतात. भामरागडात २० ते ३० रूपये दराने गोरगा द्रव्याची बॉटल विकली जात असल्याने काही नागरिक गोरगाची झाडे लावण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे बिनागुंडा, लाहेरी येथील काही युवकांनी बुधवारी भरणाऱ्या भामरागड येथील आठवडी बाजारात दोन ते तीन फूट उंचीची गोरगाची झाडे विक्रीसाठी आणली. त्याचबरोबर गोरगा झाडाच्या बिया सुध्दा विक्रीस आणल्या होत्या. सदर बिया व झाडे अगदी २० मिनिटात विकल्या गेली. वृक्ष लागवडीसाठी शासनाकडून नागरिकांना आवाहन केले जाते. घरापर्यंत रोपटे पोहोचवून दिल्या जाते. तरीही नागरिक वृक्षारोपण करीत नाही व वृक्ष लावले तरी त्याचे संगोपण करीत नाही. मात्र गोरगाची झाडे खरेदी करण्यास मोठी रांग लागली होती. बिनागुंडातून गोरगाचे वृक्ष विक्रीसाठी आणले जात असल्याने भामरागड परिसरातही ताडांच्या झाडा प्रमाणेच गोरगाच्या झाडांचेही संख्या वाढत चालली आहे.