शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
4
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
5
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
6
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
7
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
8
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
9
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
11
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
12
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
13
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
14
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
15
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
16
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
17
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
18
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
19
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
20
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठाची भरती प्रक्रिया वांद्यात येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:47 IST

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात गैरप्रकार

चौकशीची मागणी : मुलाखत समितीतील सदस्याचीच सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्तीगडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात गैरप्रकार व अनागोंदीची मालिका अद्यापही खंडीत झालेली नाही. अलिकडेच झालेल्या भरती प्रक्रियेबाबतही विविध आरोप, प्रत्यारोप दररोज होत असल्याने ही भरती प्रक्रिया वाद्यांत येण्याची शक्यता दिसत आहे. काही प्राध्यापक व शिक्षक संघटनांनी या भरती प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. गोंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकाची भरती प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेत अनेक पात्र उमेदवारांना डावलण्यात आले, ५५ टक्के गुण अपेक्षित असताना कमी टक्केवारी असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली. तसेच भरती प्रक्रिया राबविताना नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे प्रकार आता उघडकीस आले आहे. इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले प्रा. डॉ. विवेक जोशी हे मुलाखत समितीचे सदस्य असताना त्यांनी स्वत:च मुलाखत दिली. मुलाखत देण्यापूर्वी त्यांनी या समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा का दिला नाही. हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या भरती प्रक्रियेचा पोळा आधीच फुटला. या संदर्भात अनेक माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावर विद्यापीठाच्या कुलगुरूंसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. विद्यापीठाने निवड झालेल्या प्राध्यापकांची यादी घाईगडबडीत प्रसिध्द केली असून वेबसाईटवरही ती उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे जे प्रा.डॉ. जोशी मुलाखत समितीचे सदस्य होते, त्यांची मुलाखत घेऊन त्यांचीच नियुक्ती करण्याचे पुण्यकर्मही विद्यापीठाने पार पाडले आहे. जोशी हे इंग्रजी विषयाचे अधिष्ठाता असून व्यवस्थापन व विद्याशाखेचे सदस्यही आहेत. त्यामुळे मुलाखत समितीत त्यांचा समावेश होता, असे असताना त्यांनी मुलाखत दिली व त्यांची आपसुकच निवड झाली, असे दिसून येत आहे. या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव हे दोघेही प्रक्रिया कायदेशीर झाल्याचे विविध माध्यमांना वारंवार सांगत असून कुलगुरूंनी तर कुणाला संशय असेल तर त्यांनी थेट पोलिसात तक्रार करावी किवां न्यायालयात जावे, असे थेट आवाहनच माध्यमांशी बोलताना दिले आहे. एकूणच या भरती प्रक्रियेनंतरही विद्यापीठाच्या गैरकारभाराचा ससेमिरा थांबलेला नाही. या पूर्वीही निर्मितीपासूनच गोंडवाना विद्यापीठ विविध कारणांनी गाजत राहिले आहे. ती परंपरा यावेळीही कायमच राहिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)