गोडलवाही-पेंढरी मार्ग उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:37 IST2021-04-16T04:37:34+5:302021-04-16T04:37:34+5:30

धानोरा : तालुक्यातील गोडलवाही, महागाव, पेंढरी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या ...

The Godalwahi-Pendhari road was dug up | गोडलवाही-पेंढरी मार्ग उखडला

गोडलवाही-पेंढरी मार्ग उखडला

धानोरा : तालुक्यातील गोडलवाही, महागाव, पेंढरी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धक्के खावे लागत आहेत. महामंडळाची बसही या मार्गावरून कशीबशी धावत आहे. सातत्याने मागणी करूनही या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केली नाही. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शासनाच्या नियोजनशून्यतेमुळे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. येथे अपघाताची शक्यता वाढली आहे. सदर मार्ग रहदारीचा असून, येथून दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते. मागील वर्षीच्या पावसाळ्यात मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.

Web Title: The Godalwahi-Pendhari road was dug up