नवाेदय विद्यालयातील कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:48+5:302021-01-17T04:31:48+5:30

घाेट : केंद्र शासनाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवाेदय विद्यालयातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिली जात नाही. या कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात ...

Give pension to the employees of Navaidya Vidyalaya | नवाेदय विद्यालयातील कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या

नवाेदय विद्यालयातील कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या

घाेट : केंद्र शासनाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवाेदय विद्यालयातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिली जात नाही. या कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात अनेक अडचणी व समस्यांचा सामना करावा लागताे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी, अशी मागणी नवाेदय विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशात एकूण ७०० नवोदय विद्यालये चालविली जात आहेत. जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील शिक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे संघटन शक्य नाही. १९८६ पासून नवोदय विद्यालय सुरू झाले. तेव्हापासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा पेन्शन मिळत नाही. विशेष म्हणजे, केंद्रीय विद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत आहे. अशास्थितीत नवोदय विद्यालयातील कर्मचाऱ्यांवर एकप्रकारे अन्याय होत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील नवोदय विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची समस्या लक्षात घेऊन पेन्शन लागू करावी, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्राचार्य नागेश्वर राव, उपप्राचार्य राजन गजभिये, शिक्षक संजय चौधरी व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Give pension to the employees of Navaidya Vidyalaya