शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाला जिल्हास्तरावरील मोठे पद बहाल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST

३ जुलैला आरमोरी येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत कुणाचे पद काढून कुणाला देण्याची मागणी करण्यात आली नव्हती तर देसाईगंज ...

३ जुलैला आरमोरी येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत कुणाचे पद काढून कुणाला देण्याची मागणी करण्यात आली नव्हती तर देसाईगंज तालुक्याच्या कुणबी समाजाला जिल्हास्तरावर मोठे पद देण्यात यावे, याबाबतच सर्वानुमते ठराव घेण्यात आला होता. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे दीड वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यप्रणालीवर कोणताही आक्षेप घेण्यात आला नसताना व त्याबाबत चर्चाही झाली नसल्याचा खुलासाही पार पडलेल्या बैठकीत करण्यात आला आहे. दरम्यान, ११ जुलै २०२१ रोजी देसाईगंज येथील भरत जोशी यांच्या शिवसेना कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या आदेशानुसार व आरमोरी विधानसभा जिल्हाप्रमुख यांच्या सूचनेनुसार देसाईगंज तालुक्यात १६ व १७ जुलैला शिवसंपर्क अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले असून हा अभियान यशस्वी करण्यासाठी देसाईगंज तालुका शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन कोणतेही मनभेद, मतभेद न करता पक्षवाढीसाठी एकजुटीने कामाला लागण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीला आरमोरी विधानसभा जिल्हाप्रमुख सुरेंन्द्रसिंह चंदेल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, आरमोरी विधानसभा क्षेत्र समन्वयक गोपाल चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर मेश्राम, तालुका प्रमुख विजय सहारे, ग्रामीण तालुका प्रमुख प्रशांत किलनाके, विठ्ठल ढोरे, आनंद सिंग चावला, बालाजी ठाकरे, शहर प्रमुख देवराव बेदरे, गुरुदेव अवसरे, विजय दडमल, प्रभाकर चौधरी, ञ्यंबक भजणे, जग्गी परसवाणी, महेश चिंचेकर, रामचंद्र बुल्ले, श्यामराव चांदेवार, श्रीधर पाटील, दादाजी वाटकर, महेंद्र मेश्राम, दीक्षित मेश्राम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

110721\3847img-20210711-wa0068.jpg

देसाईगंज येथील सभेत मार्गदर्शन करतांना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल.देसाईगंज तालुक्याला जिल्हास्तराव मोठे पद बहाल करण्यात यावे.