पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीचे गडचिरोलीत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST2021-02-06T05:09:51+5:302021-02-06T05:09:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटाेले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल ...

Gadchiroli welcomes Patole's election as State President | पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीचे गडचिरोलीत स्वागत

पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीचे गडचिरोलीत स्वागत

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटाेले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल गडचिराेली शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी इंदिरा गांधी चाैकात फटाके फोटून आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला काँग्रेस अध्यक्ष भावना वानखेडे, बंडोपंत शनिवारे, समशेरखाँ पठाण, रमेश चौधरी, सुनील डोंगरा, रजनीकांत मोटघरे, नीतेश राठोड, मिलिंद बागेसर, दिवाकर मिसाळ, जितेंद्र मुनघाटे, वसंत गावतुरे, पंकज बारशिंगे, प्रतीक बारशिंगे, घनश्याम मुरूमकर, हेमंत भांडेकर, राकेश गणवीर, शेखर आखाडे, कमलेश खोब्रागडे, कुलदीप लोणारे, देवरू मेश्राम, सुरेश बांबोडे, अभिजित जाहीर, समीर ताजने, संजय घोटेकर, वसंत राऊत, बाळासाहेब आखाडे, राकेश रत्नावार, गौरव आलाम, नंदू वाईलकर, शंकरराव सालोटकर, गौरव येनप्रेडिवार, श्री. धंदरे आदी उपस्थित हाेते.

(बॉक्स)

नवसंजीवनी मिळणार

काँग्रेसच्या प्रदेश कमिटीचे नेतृत्व ओबीसी नेत्याकडे साेपविल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे सांगत काँग्रेसच्या डाॅक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डाॅ. प्रमाेद साळवे यांनी निवडीचे स्वागत केले. देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष जेसा माेटवानी यांनीही पटाेले यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळणार, अशी आशा व्यक्त केली.

Web Title: Gadchiroli welcomes Patole's election as State President