शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्याने गडचिरोलीवासीय धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

गडचिराेली शहराच्या चामाेर्शी, धानाेरा, चांदाळा, पाेटेगाव मार्गाला लागून जंगल आहे. जंगलामुळे या भागात सकाळी आल्हाददायक वातावरण राहात असल्याने मन व शरीराचा थकवा दूर हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे अनेक नागरिक या मार्गांवर फिरायला जातात. मागील वर्षभरापासून धानाेरा ते चामाेर्शी मार्गाला जाेडून असलेल्या जंगलात वाघ व बिबटे नागरिकांना दिसून येत हाेते. मात्र आजपर्यंत गडचिराेली शहरातील एकाही व्यक्तीवर वाघाने तसेच बिबट्याने हल्ला केला नव्हता.

ठळक मुद्देशहराजवळ पोहोचला वाघ, फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्यांमध्ये धास्ती

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : चामाेर्शी, धानाेरा, चांदाळा, पाेटेगाव मार्गावर फिरायला जाणाऱ्यांना आजपर्यंत वाघ व बिबट्याचे दर्शन हाेत हाेते. मात्र बुधवारी गडचिराेली शहरापासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या चांदाळा मार्गावर इंदिरानगरातील महिलेवर भरदुपारी हल्ला करून वाघाने ठार केले. प्रथमच शहराच्या एवढ्या जवळ वाघ पोहोचल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ज्या भागात वाघाने महिलेवर हल्ला केला त्या भागात सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यात आता धास्त पसरली आहे.गडचिराेली शहराच्या चामाेर्शी, धानाेरा, चांदाळा, पाेटेगाव मार्गाला लागून जंगल आहे. जंगलामुळे या भागात सकाळी आल्हाददायक वातावरण राहात असल्याने मन व शरीराचा थकवा दूर हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे अनेक नागरिक या मार्गांवर फिरायला जातात. मागील वर्षभरापासून धानाेरा ते चामाेर्शी मार्गाला जाेडून असलेल्या जंगलात वाघ व बिबटे नागरिकांना दिसून येत हाेते. मात्र आजपर्यंत गडचिराेली शहरातील एकाही व्यक्तीवर वाघाने तसेच बिबट्याने हल्ला केला नव्हता. त्यामुळे धाेका असतानाही अनेक नागरिक या मार्गांवर फिरण्यासाठी जात हाेते. बुधवारच्या घटनेने मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील इंदिरानगर, स्नेहनगर, विवेकानंदनगर, गाेकुलनगर, रामनगरापासून जंगल काही दूर अंतरावर आहे. भविष्यात वाघ व बिबटे शहरात शिरून नागरिकांवर हल्ले करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाघाचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्यासह इंदिरानगरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.  हे प्रकरण वनविभागाने अतिशय गंभीरतेने घेण्याची गरज आहे. अन्यथा नागरिकांच्या जीवाला धाेका आहे. 

‘वाघाचा बंदोबस्त करण्याचे खासदारांचे निर्देशगडचिरोली शहरानजिक वाघाच्या हल्ल्यात कोणी व्यक्ती ठार होण्याची घटना प्रथमच घडली. याबाबतची माहिती मिळताच खासदार अशोक नेते यांनी मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून माहिती जाणून घेतली. त्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा, असे निर्देश त्यांनी दिले. इंदिरानगर, चांदाळा रोड, पोटेगाव रोड, सेमाना देवस्थानच्या जंगल परिसरात पिंजरे लावून वाघाला जेरबंद करावे, तसेच हल्ल्यात मृत महिला सुधा चिलमवार यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशीही सूचना खा.नेते यांनी केली.

 

टॅग्स :Tigerवाघ