विकासात गडचिरोलीला प्रथम प्राधान्य

By Admin | Updated: May 2, 2015 01:29 IST2015-05-02T01:29:40+5:302015-05-02T01:29:40+5:30

शासनाच्या वतीने जिल्ह्याच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाकडून ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट निधी मंजूर करण्यात आला आहे.

Gadchiroli is the first priority in the development | विकासात गडचिरोलीला प्रथम प्राधान्य

विकासात गडचिरोलीला प्रथम प्राधान्य

गडचिरोली : शासनाच्या वतीने जिल्ह्याच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाकडून ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. राज्याच्या विकासात गडचिरोली जिल्ह्याला प्रथम प्राधान्य राहिल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५५ व्या वर्धापण दिन कार्यक्रमात जनतेला संदेश देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार , जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक लक्ष्मी अण्णाबत्तुला, नगराध्यक्ष निर्मला मडके, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद दशमुखे, ओमप्रकाश संग्रामे, महेश पडोळे यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
पंतप्रधान पुरस्काराने गौरव
जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ही जिल्हावासियासाठी अभिमानाची बाब आहे, असेही पालकमंत्री आत्राम यावेळी म्हणाले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
याप्रसंगी पोलीस विभागाच्या १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह तसेच महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या तहसीलदार अजय चरडे, डी.एस. नैताम, मंडल अधिकारी एम. एच. राऊत व एका तलाठ्याना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच स्काऊट गाईडच्या राष्ट्रपती पदक प्राप्त ८ विद्यार्थिनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Gadchiroli is the first priority in the development