शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli: नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा, गडचिरोलीत सकाळी सातपासून गर्दी, माओवादग्रस्त भागातही मतदान सुरळीत 

By संजय तिपाले | Updated: April 19, 2024 09:48 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: माओवादग्रस्त व राज्यातील सर्वांत संवेदनशील गडचिरोलीत शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात नवमतदार उत्साहाने सहभागी झाले होते तर ज्येष्ठ नागरिकांनीही गर्दी केली होती.

- संजय तिपालेगडचिरोली - माओवादग्रस्त व राज्यातील सर्वांत संवेदनशील गडचिरोलीत शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात नवमतदार उत्साहाने सहभागी झाले होते तर ज्येष्ठ नागरिकांनीही गर्दी केली होती.

गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात १० उमेदवार आहेत. सहा विधनासभा क्षेत्रांचा यात समावेश आहे. १८९१ मतदान केंद्रांवर १६ लाख १८ हजार ६९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात पुरुष मतदार ८ लाख १४ हजार ७६३ असून महिला मतदारांची संख्या  ८ लाख २ हजार ४३४ आहे. तृतीयपंथी १० मतदार आहेत. संवेदनशील ३१९  मतदान केंद्रे असून माओवाद्यांकडून घातपाती कारवाया होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे १५ हजार जवानांचा फौजफाटा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. गडचिरोलीसह आरमोरी, अहेरी तसेच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या चार विधानसभा क्षेत्रात सकाळी सात ते दुपारी तीन अशी मतदानाची मुदत आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व चिमूर येथे सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

गडचिरोली शहरासह दुर्गम - अतिदुर्गम भागात सकाळच्या टप्प्यातच मतदारांनी गर्दी केली. जिल्ह्यातील तापमान ४३ अंशावर पोहोचलेले आहे त्यामुळे अनेक मतदार सकाळीच मतदान करण्यासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले.

कुरखेडा येथे दीड तास उशिराने सुरू झाले मतदान  कुरखेडा येथे ग्रामीण विकास उच्च प्राथमिक शाळा खोली क्र. २ येथील ईव्हीएममध्ये बिघाड आल्याने मतदान सकाळी सात वाजता सुरू होऊ शकले नाही. दुसरे ईव्हीएम लावून मतदान सुरू केले, पण त्यातही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे तब्बल दीड तास मतदार ताटकळले होते. आता मतदानप्रक्रिया सुरळीतसुरू झाली आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरVotingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४