शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीवरील पुलाचे भवितव्य अंधांतरी

By admin | Updated: April 2, 2016 01:49 IST

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पूल हा ठेंगणा असल्याने पावसाळ्यात पुरामुळे कित्येकदा मार्ग बंद असतो.

आष्टी-गोंडपिंपरी मार्ग : जुन्या पुलाची मर्यादा संपलीआष्टी : चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पूल हा ठेंगणा असल्याने पावसाळ्यात पुरामुळे कित्येकदा मार्ग बंद असतो. तसेच हा पूल बऱ्याच वर्षापूर्वीचा असल्याने या पुलाची मर्यादाही संपलेली आहे. या नदीवर नवीन पुलाची मागणी नागरिकांनी केली. परंतु अलीकडेच घाटकुळ-मुधोली-येनापूर रस्त्यावरील वैनगंगा नदीवर उंच पातळीच्या मोठ्या पुलाच्या बांधकामाला केंद्रीय मार्ग निधीतून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे भवितव्य सध्यातरी अधांतरी असल्याचे दिसते.चंद्रपूरवरून येणारा राष्ट्रीय महामार्ग बामणीपर्यंत चारपदरी करण्यात आला आहे. पुढे तो आष्टीपर्यंत होणार असल्याची चर्चा आहे. परंतु अलीकडेच पोंभुर्णा-चामोर्शी तालुका जोडणारा मोठा पूल वैनगंगा नदीवर केंद्रीय निधीतून होणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आता आष्टीजवळील पूल होण्याची आशा मावळली आहे. यामागे कारण म्हणजे १० किमी अंतरावर लगेच नवीन पुलाला मंजुरी मिळणार काय, तसेच सध्याचा पूल हा बुडीत पूल म्हणून नोंद आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाबद्दल अनेक शंका उपस्थित होत आहे. तेलंगणा सरकारतर्फे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आष्टी येथील पूल पाण्याखाली राहण्याची शक्यता आहे. आष्टी शहरातून चंद्रपूर, सिरोंचा व साकोली-सिरोंचा हे दोन्ही महामार्ग जात असताना हा आडवाटेचा पूल बनवून गोंडपिपरी-आष्टी हा मार्ग बंद करण्याचा घाट दिसतो. जुन्या मार्गाला उलट खर्च कमी येऊ शकतो. जुन्या पुलाची उंची वाढवून सरळ असणारा मार्ग डावलून काय साध्य करायचे आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सिरोंचा-अहेरीपासून उपराजधानीला जोडणारा हा सरळ मार्ग आहे. दिवसातून महामंडळाच्या खासगी बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. वाहनाची संख्या वाढल्याने या मार्गावरील रहदारीही वाढलेली आहे. वैनगंगा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.