शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रुग्णालयाला एमआयआर मशीनसाठी निधी द्या

By admin | Updated: June 24, 2016 02:03 IST

गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखूमुक्ती कार्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली

निधीवर आक्षेप : आम आदमी पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखूमुक्ती कार्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्याकडून सर्च या संस्थेला ५० लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र सदर निधी समाजकल्याण विभागाने सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या मार्फतीने सर्च या संस्थेला ५० लाख रूपयांचा निधी वळता केला आहे. सद्य:स्थितीत तंबाखू व दारू मुक्तीसाठी ५ कोटी रूपये खर्च करण्याची गरज आहे काय, असा सवाल आम आदमी पक्षाचे जिल्हा संयोजक प्रा. अशोक लांजेवार, जिल्हा सहसंयोजक भगवान चुधरी यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक आजाराने लोक त्रस्त आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआयआरची यंत्रणा लावण्यासाठी हा निधी दिल्यास जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना याचा लाभ होईल. एमआयआर यंत्रणेमुळे ब्रेन स्पाईन, अ‍ॅबडॉमिन, पेलव्हीस, हातपाय ब्रेकिंयल, प्लेक्सेस, प्रोस्टेट आदींच्या रुग्णांनाही दिलासा मिळेल. महाराष्ट्रात कोणत्याही जिल्हा सामान्य रुग्णालयात अशी व्यवस्था नाही. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात अशी सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्यास मोठ्या शहरात महागडी औषधी व उपचाराचा खर्च करण्यापासून नागरिकांना दिलासा मिळेल. त्यामुळे आदिवासी विकास विभागामार्फत सर्च संस्थेला मंजूर केलेला निधी देऊ नये, तो जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआयआर मशीन खरेदीसाठी द्यावा, अशी मागणीही आप पक्षाने केली आहे.या संस्थेला निधी दिल्या गेल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही आपचे जिल्हा संयोजक लांजेवार यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)