हरणाच्या अवयवासह चार शिकाऱ्यांना अटक

By Admin | Updated: June 16, 2015 02:11 IST2015-06-16T02:11:01+5:302015-06-16T02:11:01+5:30

वैरागड वन परिक्षेत्रांतर्गत मेंढेबोडी जंगल परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावल्या जात

Four hunters arrested with the limp of life | हरणाच्या अवयवासह चार शिकाऱ्यांना अटक

हरणाच्या अवयवासह चार शिकाऱ्यांना अटक

वनाधिकाऱ्यांची कारवाई : मेंढेबोडीत सुरू होती मांसाची विल्हेवाट
वैरागड : वैरागड वन परिक्षेत्रांतर्गत मेंढेबोडी जंगल परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारावरून वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेंढेबोडी गावात धाड टाकून हरणाच्या मांसासह चार शिकाऱ्यांना अटक केल्याची घटना सोमवारी घडली.
तुलाराम मडावी, गौतम लालाजी दुग्गा रा. मेंढेबोडी, बारीकराव गावडे रा. सोनेरांगी व देवनाथ दुग्गा रा. कराडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वैरागड येथील वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेंढेबोडी येथे तुलाराम मडावी यांच्या घरी धाड टाकली असता, या ठिकाणी हरणाच्या मांसाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू होता. वनाधिकाऱ्यांनी मडावी यांच्या घरून हरणाचे मांस, डोके, पाय आदी अवयव व फास, कुऱ्हाड हे शिकारीचे साहित्य जप्त केले. बारीकराव गावडे, तुलाराम मडावी, देवनाथ दुग्गा या चार आरोपींना अटक केली. त्यानंतर दारूच्या नशेत गावाबाहेर झाडाखाली पडून असलेल्या देवनाथ दुग्गा रा. कराडी यालाही वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या चारही आरोपींवर वनकायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिकार प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
सदर कारवाई आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर, क्षेत्र सहायक शेंडे, वनरक्षक एम. के. निमजे, पी. के. कोडमलवार, आर. टी. किरमिरे, के. टी. ठिकरे, गीते, रेमाजी तलांडे, तामराव टेंभुर्णे, सोमेश्वर दोनाडकर आदींनी केली. (वार्ताहर)

Web Title: Four hunters arrested with the limp of life